शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

बोंडअळीच्या फटक्यानंतरही कापसालाच पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:00 IST

लागवड वाढली : मका दुसऱ्या क्रमांकावर; ५० गावांसाठी साडेआठ कोटींचा निधी

श्यामकुमार पुरेसिल्लोड : बोंडअळीचा फटका बसल्यानंतरही यंदा सिल्लोड तालुक्यात शेतकºयांनी पहिली पसंती कापसाला व दुसरी पसंती मकाला दिली आहे. सिल्लोड तालुक्यात पिके लहान असली तरी पुन्हा कापसावर बोंडअळी शिरकाव करताना दिसत आहे. तर मकाला खोड कीड लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.बोंडअळी व खोड कीडींना आतापासूनच कसे रोखावे, एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा वापर कसा करावा, याबाबत कृषी विभाग शेतकºयांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.सिल्लोड तालुक्याचे एकूण भौगोलीक क्षेत्र १ लाख २१ हजार ४९७ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख २ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात १०० टक्केच्या वर पेरणी झाली आहे. १० टक्के शेतकºयांना धूळ पेरणी केल्याने, वन्य प्राण्यांनी पिके फस्त केल्याने, तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेर करावी लागली.सिल्लोड तालुक्यात ४२२५२ हेक्टर कापसाची लागवड करण्यात आली. त्या पाठोपाठ ४१२०१ हेक्टरवर मका लागवड करण्यात आली. बाजरी -७४७, ज्वारी २५४, मिरची २६७२, मूग २९१७, उडीद २५६४, तूर २७५६, सूर्यफूल ०, अद्रक ७२१, हळद ४६, भुईमूग ३७६, सोयाबीन ४०२९, ऊस ३५८, तर भाजीपाला १५३० हेक्टरवर लावण्यात आला.१२ गावांना दोन दिवसात मिळणार बोंडअळीचे २ कोटी रुपयेसिल्लोड तालुक्यात बोंडअळीसाठी ३२ कोटी रुपये मंजूर झाले होते. यापैकी पहिल्या टप्प्यात ४५ गावांच्या शेतकºयांना ८ कोटी रुपये वाटप करण्यात आले. तर दुसºया टप्यात पुन्हा १० कोटी ६७ लाख रुपये निधी सिल्लोड तहसीलला प्राप्त झाला असून खालील १२ गावांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून येत्या २ दिवसात केळगाव येथील ८८९ शेतकºयांना ३६ लाख ५७ हजार ७८८ रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.इतर गावे शेतकरी व निधी असाघटांब्री ७३९-निधी २५५१६३२, जंजाळा २९३-४७४८४४, गोळेगाव बु. ३५४-१४९९७०४, पानवडोद बु. ५६१-२५८२३६४, वसई ४६८-३१०५९००, मोहाळ २७७-१७७६८४०,धोंडखेडा ४७-१७१२९२, गव्हाली ६३३-२५००२२४, हट्टी ३५८ -२००२६००,धामणी २९२-१६१४६००, सिसारखेडा -३००-११७७६६४, अशा एकूण १२ गावांतील ५ हजार २११ शेतकºयांना २ कोटी ३१ लाख १९ हजार ४५२ रुपये २ दिवसात वाटप करण्यात येणार आहे. सिल्लोड तहसीलमार्फत कोषागारात याद्या पाठविण्यात आल्या आहेत.उर्वरित ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जवळपास ४० ते ५० गावांच्या शेतकºयांना मिळणार आहे. सिल्लोड तालुक्यात एकूण १३१ गावे आहेत. या पैकी पहिल्या टप्प्यात ४५ गावांना निधी वितरित करण्यात आला आहे. दुसºया टप्यात ५० ते ६० गावे होतील. उर्वरित गावांना तिसºया टप्यात निधी मिळणार आहे.८ कोटी ५० लाख रुपये वाटप करण्यासाठी याद्या युद्ध पातळीवर तयार करणे सुरू आहे. शेतकºयांना येत्या ८ दिवसात हा निधी वितरित केला जाईल. आधार कार्ड क्रमांकनुसार याद्या तयार करण्यात येत असल्याने विलंब होत आहे. पण लवकरच शेतकºयांना बोंडअळीचा निधी मिळेल.-संतोष गोरड, तहसीलदार

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी