शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार; पोलीस प्रशिक्षणार्थी तरुणी पोहोचली पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:25 IST

या काळात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देतीन वर्षाच्या ‘रिलेशनशिप’नंतर धोकालग्नास नकार दिल्याने पोलीस ठाण्यात

औरंगाबाद : पोलीस प्रशिक्षण स्पर्धा परीक्षेसाठी शहरात आलेल्या एका तरुणीच्या मजबुरीचा फायदा घेत एका परधर्मीय तरुणाने आर्थिक मदत करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याचे आमिष दाखवून सलग तीन वर्षे तिचे लैंगिक शोषण केले व शेवटी तू काळी आहेस, तुझ्यात आता मला रस नाही, असे म्हणत लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तरुणीने सिडको ठाण्यात त्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली.

घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे बी.ए. द्वितीय वर्षांपर्यंत शिक्षण घेऊन एक २९ वर्षीय तरुणी स्पर्धा परीक्षेसाठी औरंगाबादेत आली. ती मैत्रिणींसोबत किरायाच्या खोलीत राहत होती. अचानक एके दिवशी तिच्या गावाजवळचा ओळखीचा शेख शाकीर शेख कासीम (वय ३०) हा तिला टीव्ही सेंटर चौकात भेटला. तो येथील पोलीस प्रशिक्षण संस्थेत पोलीस भरतीची तयारी करतो. त्यानंतर त्यांची नेहमी भेट होत राहिली व पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तिला पोलीस भरतीची तयारी करण्याचा सल्ला देऊन रोज तिची मैदानावर तयारी घेऊ लागला. तयारी करताना अंगाला जाणीवपूर्वक स्पर्श करत असतानाही तिने त्याकडे दुर्लक्ष केले. 

ऑक्टोबर २०१७ मध्ये ही तरुणी गावाकडून परत आल्यानंतर त्याने तिला प्रपोज केले. तिने नकार देताच त्याने आत्महत्येची धमकी दिली. याशिवाय त्याने लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे तिने त्याला होकार दिला. त्यानंतर ते दोघे टीव्ही सेंटर, साई मंदिराजवळ खोली घेऊन पती-पत्नीसारखे राहू लागले. त्याने तिथे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न करण्याची आठवण दिल्यानंतर तो सतत टाळत असे. त्यामुळे दोघांत भांडण झाले व ती गावी निघून गेली. एक महिन्यानंतर शाकीरने फोन करुन अभ्यासासाठी औरंगाबादला येण्यास सांगितले. इथे आल्यावर त्याने गोदावरी शाळा परिसरात खोली भाड्याने घेतली व ते दोघे तिथे दोघे राहू लागले. या काळात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने तक्रार नोंदविली. या प्रकरणी महिला फौजदार आबूज तपास करीत आहेत.

लग्नास नकार, ‘ती’ पोहोचली पोलीस ठाण्यातसन २०१७ ते एप्रिल २०२० पर्यंत सलग तीन वर्षे ते दोघे ‘रिलेशनशिप’मध्ये राहिले व शाकीरने तिचे लैंगिक शोषण केले. मे महिन्यात तिने पुन्हा लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावला. तेव्हा त्याने शिवीगाळ करून तिला मारहाण केली. तू मला आता आवडत नाही. तू काळी आहेस. तुझ्यात मला रस नाही, असे म्हणून लग्नास नकार दिला. शेवटी आपली फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद