शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

खैरेच काय, मी कोणालाही घाबरत नाही; अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 13:16 IST

Shivsena Leader Chandrakant Khaire Vs Ambadas Danwey औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून खैरे आणि आ. दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

ठळक मुद्देखैरे कळण्यापेक्षा शिवसेना कळणे महत्त्वाचे

औरंगाबाद : खैरेच काय, मी कोणालाही घाबरत नाही, अशा शब्दांत आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर दिले. काल खैरे यांनी कोण अंबादास दानवे, मी त्याचे नाव घेऊन त्याला मोठं करीत नाही, असे विधान केले होते.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून खैरे आणि आ. दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खैरे हे माझे ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, एवढेच मी बोलू शकतो, अशी सुरुवात करून आ. दानवे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.खैरे यांनी आतापर्यंत माझ्याविरुद्ध वरिष्ठांकडे पंचवीस तक्रारी केलेल्या आहेत; मी मात्र एकही तक्रार केलेली नाही, असे आ. दानवे म्हणाले. आपण खैरे यांना घाबरता का, असे विचारले असता दानवे उत्तरले, खैरेच काय, मी कोणालाही घाबरत नाही. आपणास खैरे अजून कळलेले नाहीत काय, असे विचारता दानवे म्हणाले, खैरे कळण्यापेक्षा शिवसेना कळणे महत्त्वाचे आहे. काही जणांना पक्षशिस्त कळत नाही, असे खैरे म्हणतात, याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे उत्तरले, पत्रकारांकडे जाऊन तक्रार करणे ही पक्षाची शिस्त आहे का, यापेक्षा त्यांनी एक फोन करून मला बोलावले असते तर मी त्यांच्याकडे गेलो असतो.

बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवायला हवी होती. उद्धव ठाकरे यांना छळणाऱ्या भाजपबरोबर जाण्याची गरज नव्हती, असे खैरे म्हणतात याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे म्हणाले, सहकाराच्या निवडणुकीत मी नवा आहे. मात्र संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते वर्षानुवर्षे बँकेचे संचालक आहेत. आता यावेळीही सात उमेदवार शिवसेनेचे पदाधिकारी शेतकरी विकास पॅनलमध्ये आहेत. सहकारात पक्ष नसतोच.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना