शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाशी संलग्न फक्त १५ महाविद्यालयांतील प्रवेश संख्या 'जैसे थे'

By राम शिनगारे | Updated: June 14, 2023 20:13 IST

महाविद्यालयांचे ऑडीट; ३९४ पैकी २७० महाविद्यालयांनी त्रुटीची पूर्तता केल्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाने ३९४ महाविद्यालयांचे ॲकडमीक ऑडिट केले आहे. त्या ऑडिटमध्ये दाखविलेल्या त्रुटींची पुर्तता केल्याचा दावा २७० महाविद्यालयांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केला. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी केली असता, त्यातील केवळ १५ महाविद्यालयांनीच त्रुटींची पूर्तता केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केवळ या १५ महाविद्यालयांतील जागांची संख्याच 'जैसे थे' होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ३९४ महाविद्यालयांचे ॲकडमीत ऑडिट करण्यात आले आहे. त्यात १३० महाविद्यालयांना कोणताही ग्रेड मिळालेला नव्हता. ९८ महाविद्यालयांना 'डी' ग्रेड प्राप्त झाला तर 'ए' ग्रेडमध्ये ६१, 'बी'मध्ये ४८ आणि 'सी'ग्रेडमध्ये ५७ महाविद्यालयांचा समावेश होता. ॲकडमीत ऑडिट करताना विद्यापीठ प्रशासनाने संबंधितांना महाविद्यालयांमध्ये पायाभुत सुविधांमध्ये असलेल्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या. तसेच या त्रुटी दुर करण्यासाठी काही कालावधीही देण्यात आला होता. विद्यापीठ प्रशासनाकडे ३९४ पैकी २७० महाविद्यालयांनी त्रुटी दुर केल्याचा दावा केला आहे. त्यातील २२५ पेक्षा अधिक महाविद्यालयांची पडताळणी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने केली आहे. त्यात केवळ १५ महाविद्यालयांनी त्रुटीची पुर्तता केली असल्याचे समोर आले. त्यामुळे त्रुटीची पुर्तता केलेल्या महाविद्यालयांमधीलच विद्यार्थी संख्येच्या जागा पूर्ववत केल्या जातील. उर्वरित महाविद्यालयांना ही संधी दिली जाणार नाही. त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई कायम ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

या महाविद्यालयांना संबंधित ऑडिटवर आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यात २७० महाविद्यालयांनी आक्षेप नोंदवले. त्या महाविद्यालयांच्या पायाभुत सुविधांचा पुन्हा पडताळणी केली असता केवळ १५ महाविद्यालयांनाच दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद