शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद ! मातेसाठी सरसावले दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तगटाचे दाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:28 IST

राज्यभरात झाला दुर्मिळ रक्तगटाच्या दात्यांचा शोध 

ठळक मुद्देरक्त उपलब्ध नसताना घाटीतील डॉक्टरांनी केली यशस्वी प्रसूतीविविध यंत्रणांद्वारे रक्तदाता शोधण्याचे काम पार पाडले

औरंगाबाद : तुम्हाला ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा रक्तगट माहीत आहे? आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाविषयी माहितीच नसेल; परंतु हा रक्तगट उपलब्ध नसतानाही प्रसूती यशस्वी करण्याची किमया घाटीतील डॉक्टरांनी केली. मात्र, प्रसूतीनंतर अवघ्या एक दिवसाच्या मुलीच्या मातेला या रक्ताची नितांत गरज पडलीच आणि राज्यभरातील; पण मोजकेच असलेले दाते या मातेसाठी सरसावले.

जालना जिल्ह्यातील मनीषा सोनवणे यांची शनिवारी घाटीत प्रसूती झाली आहे. नवजात मुलीची प्रकृत्ती उत्तम आहे; परंतु मनीषा सोनवणे यांची प्रकृती नाजूक आहे. प्रसूतीपूर्वी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्यात आले. तेव्हा त्याचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे ५.६ ग्रॅम आढळले. हे प्रमाण कमीत कमी ११ ग्रॅम हवे. त्यामुळे प्रसूतीदरम्यान त्यांना गरज पडली, तर कोणता रक्तगट द्यावा लागेल, याची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यांचा रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप असल्याचे निदान झाले; परंतु हे रक्त उपलब्ध नव्हते. हे आव्हान पेलत प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टरांनी प्रसूती यशस्वी केली. 

सुदैवाने नैसर्गिक प्रसूती झाली; परंतु प्रसूतीनंतर मनीषा यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी त्यांना रक्त देणे गरजेचे आहे. त्यामुळे आता ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे रक्त शोधायचे कोठून? हा मोठा प्रश्न निर्माण झाला. सोशल मीडिया, मेसेजसह सर्व यंत्रणांच्या माध्यमातून या रक्तगटाचे रक्तदाता शोधण्याचे काम सुरू झाले. या मातेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात विचारणा करण्यात आली. रक्तगटाची सहज उपलब्धता होत नव्हती. अखेरीस हा रक्तगट असलेल्या नाशिक, नांदेड आणि जालना येथील दात्यांनी पुढाकार घेतला. यात दात्याचे रक्त घेण्यासाठी नातेवाईक रविवारी सायंकाळी जालन्याला रवाना झाले. रात्रीतून या मातेला रक्त दिले जाईल.  त्यामुळे मातेची प्रकृती धोक्यात जाण्यापासून टळणार आहे.  काही दाते औरंगाबादेत येऊन रक्तदान करतील, असेही नियोजन करण्यात आले. प्रसूतीसाठी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. सुष्मिता पवार, डॉ. श्रेया आगलावे आदींनी प्रयत्न केले. रक्ताच्या उपलब्धेसाठी अनिल लुणिया यांनी प्रयत्न केले.

असा लागला या रक्तगटाचा शोधमुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये १९५२ साली  डॉ. वाय.म. भेंडे यांना असे आढळून आले की, एका रुग्णाचा रक्तगट हा चारही गटांशी जुळत नाही. तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या लोकांचे रक्त त्या रुग्णाच्या गटाशी जुळते की नाही ते पाहायला सुरुवात केली. अनेक लोकांचे नमुने तपासल्यानंतर शेवटी कुठे तो गट जुळला. ज्या रक्तदात्याच्या रक्तगट जुळला, तो होता मुंबईचा. म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बेचा. म्हणून या वेगळ्या रक्तगटाला ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ नाव देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादBlood Bankरक्तपेढी