शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

२५ वर्षांनंतर महापालिकेवर येणार प्रशासक; जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या प्रशासकाने गाजवला कार्यकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 15:32 IST

प्रशासक म्हणून राज्य शासन कोणाला पसंती देईल, हे अद्याप निश्चित नाही. 

ठळक मुद्देमहापालिका निवडणूक ३ महिने पुढे ढकललीनिवडणूक आयोगाने केली मंगळवारी घोषणा

- मूजीब देवणीकर

औरंगाबाद : महापालिका निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने केली. १९९५ मध्ये उत्तम प्रशासक म्हणून कृष्णा भोगे यांनी महापालिकेत काम केले. त्यानंतर तब्बल २५ वर्षांनंतर महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. 

१९८२ मध्ये औरंगाबाद महापालिकेची स्थापना झाली. पहिले प्रशासक म्हणून ८ डिसेंबर १९८२ रोजी सतीश त्रिपाठी यांनी पदभार स्वीकारला. १९८८ पर्यंत विविध प्रशासकांनी महापालिकेत काम केले. आपल्या कामाचा ठसा त्रिपाठी यांनी चांगलाच उमटविला होता. १९८८ मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. महापौर निवडणुकीच्या निकालावरून शहरात दंगल उसळली होती. या दंगलीमुळे तत्कालीन पोलीस अधिकारी टी.सी. वानखेडे यांनी शहरात संचारबंदी लागू केली होती.

१९९३ पर्यंत ६० नगरसेवकांच्या सभागृहाने आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर शासनाने महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. कर्तव्यदक्ष अधिकारी कृष्णा भोगे यांची १४ जून १९९४ मध्ये प्रशासक म्हणून नियुक्ती केली. १ जुलै १९९६ मध्ये शहरातील राजकीय मंडळींनी तत्कालीन सेना-भाजप युती सरकारवर दबाव टाकून भोगे यांची बदली केली. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भोगे यांनी शहरात उत्तम काम केले. २५ वर्षांपूर्वी भोगे यांनी शहरातील प्रत्येक चौकाचे महत्त्व लक्षात घेऊन सुंदर वाहतूक बेट तयार केले होते. अत्यंत कमी निधीमध्ये भोगे यांनी शहराच्या सौंदर्यीकरणावर भर दिला होता. नंतर महापालिकेला हे वाहतूक बेट नीटपणे सांभाळताही आले नाहीत. आता पुन्हा एकदा महापालिकेवर प्रशासक येणार आहे. यामुळे नव्या प्रशासकाच्या काळात शहरात कसे काम होते, याकडे जनतेचेही लक्ष असणार आहे. २९ एप्रिल २०२० रोजी महापालिकेतील विद्यमान ११५ नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या असल्याने ३० एप्रिलपासून मनपावर प्रशासक नेमण्यात येईल. प्रशासक म्हणून राज्य शासन कोणाला पसंती देईल, हे अद्याप निश्चित नाही. 

महापालिकेवर नेमलेले आजपर्यंतचे अधिकारीनाव        कार्यकाळसतीश त्रिपाठी     ८-१२-८२ ते ०३-०३-१९८४एस. शंकर मेनन    ०३-०३-१९८४  ते ०४-०९-१९८४मनमोहन सिंह     ०१-११-१९८४ ते २३-०२-१९८६अरविंद रेड्डी        २४-०२-१९८६ ते २९-०२-१९८८कृष्णा भोगे        १४-०६-१९९४ ते ०१-०७-१९९६.....

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारElectionनिवडणूक