शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईला प्रशासन जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:05 IST

औरंगाबाद : शहरातील १५ लाखांपैकी १० ते ११ लाख नागरिकांनाच पाणी देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. चार दिवसाआडही मनपा प्रशासन ...

ठळक मुद्देतज्ज्ञांचा बॉम्बगोळा : गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोगच नाही

औरंगाबाद : शहरातील १५ लाखांपैकी १० ते ११ लाख नागरिकांनाच पाणी देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. चार दिवसाआडही मनपा प्रशासन पाणी देऊ शकत नसेल, तर याला प्रशासनच कारणीभूत आहे. शहरात सायफन पद्धतीच्या नहरींचे उदाहरण डोळ्यासमोर असतानाही मनपा गुरुत्वाकर्षण पद्धतीचा अवलंब करून पाणी देत नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाल्याचे मनपाचे निवृत्त शहर अभियंता एम.डी. सोनवणे यांनी सांगितले.शहरात आज १२० ते १२५ एमएलडी पाणी येत आहे. चार दिवसाआड हे पाणी विविध वसाहतींना देणे सहज शक्य आहे. पाचव्या दिवशी मनपा पाणी देणार असेल, तर प्रशासनाकडे चार दिवसांचे किमान ६०० एमएलडी पाणी असते. नियोजन नसल्याने सर्वत्र ओरड सुरू आहे. शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीला पाणीटंचाई म्हणता येणार नाही. ही कृत्रिम पाणीटंचाई आहे. शहरातील पाण्याचे लिकेज आजपर्यंत का बंद केले नाहीत. नक्षत्रवाडी ते जायकवाडीपर्यंत मनपाच्या एअर व्हॉल्व्हवर पाणी भरणाऱ्या नागरिकांची अलोट गर्दी असते. पाण्याची होणारी नासाडी थांबविली पाहिजे. शहरात ६० पेक्षा अधिक पाण्याच्या टाक्या कशासाठी उभारण्यात आल्या आहेत. गुरुत्वाकर्षण पद्धतीने नागरिकांना पाणी मिळावे हा उद्देश होता. नक्षत्रवाडीत ७५ फूट उंचीवर एमबीआर बांधण्यात आला. या एमबीआरला बायपास करून थेट पाणी देण्यात येत आहे. शहरातील अनेक मुख्य लाईनवरून नागरिकांना पाणी देण्याची अजब पद्धत मनपाने सुरू केली. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड आहे. शहरात पाण्याचे टप्पे पूर्वीपेक्षा शंभर पटीने वाढविण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागाने मागील तीन-चार वर्षांमध्ये सर्व मुख्य वाहिन्यांवर क्रॉस कनेक्शन घेतले आहेत. मनपाने पाणीपुरवठ्यात उपाययोजना करण्यासाठी काही तज्ज्ञ नेमले आहेत. या तज्ज्ञांनी ही वस्तुस्थिती का मांडली नाही. आजार एक उपचार दुसरा अशी अवस्था असल्याचे सोनवणे यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात