शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आदिल दरवाजा, तटबंदीला मिळणार गतवैभव; २ कोटी २५ लाखांच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 19:00 IST

तटबंदीला लागून असलेल्या खुल्या जागेचा वापर समाजिक उपक्रमांसाठी करता यावा म्हणून एक स्टेज उभारण्यात येईल.

औरंगाबाद : सुभेदारी विश्रामगृहाजवळील शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक आदिल दरवाजा आणि त्याला लागून असलेल्या तटबंदीची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. तब्बल २ कोटी २५ लाख रुपये खर्च करून दरवाजा, तटबंदीला गतवैभव मिळवून देण्यात येणार आहे. मंगळवारी या कामाला सुरुवात झाली.

सुभेदारी विश्रामगृहाकडे जाताना जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला लागून मोठी तटबंदी आहे. याला किलेअर्कची तटबंदीही म्हटले जाते. शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशद्वार म्हणजे मीर आदिल दरवाजा होय. मागील अनेक दशकांमध्ये या दरवाजासह तटबंदीकडे कोणीही लक्ष दिले नाही, त्यामुळे दरवाजा मोडकळीस आला. तटबंदीही शेवटच्या घटका मोजत होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या परिसराला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. डीपीडीसीमधून २ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दरवाजा आणि तटबंदीचे काम करण्यात येईल. त्यासाठी लातूर येथील साईप्रेम कन्स्ट्रक्शन्सला १ कोटी ५१ लाख रुपयांचे काम देण्यात आले. त्यानंतर विद्युत विभागाकडून लाईटसाठी स्वतंत्र निविदा काढली जाईल. वास्तुविशारद प्रदीप देशपांडे काम पाहत आहेत.

खुल्या जागेचा वापर सामाजिक उपक्रमांसाठीतटबंदीला लागून असलेल्या खुल्या जागेचा वापर समाजिक उपक्रमांसाठी करता यावा म्हणून एक स्टेज उभारण्यात येईल. ओपन एअर थिएटर, विविध शिबिरे, कार्यशाळा, हेरिटेज वॉक, परेड, पोलीस बँड, एनसीसी परेड, शैक्षणिक मेळावे आदी उपक्रम या ठिकाणी घेता येतील. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या कामाचा प्रारंभ मंगळवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता सुनील काकडे, प्रभाग अभियंता फारूक खान, कनिष्ठ अभियंता संतोष झापकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका