शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठ्यामध्ये दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:45 IST

अजिंठा : अजिंठा येथे प्रार्थनास्थळाजवळ डीजे वाजविल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, ...

अजिंठा : अजिंठा येथे प्रार्थनास्थळाजवळ डीजे वाजविल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, जमावाने येथील पोलीस ठाण्यावरही दगडफेक केल्याने पोलिसांच्या केबिनसह वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता बसस्थानकानजीक घडली. अजिंठा येथे तणावपूर्ण शांतता असून जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत.या घटनेतील जखमी झालेले शेख मुख्तार शेख गफ्फार (२६) व शेख इम्रान शेख गफ्फार (२३, रा. अजिंठा) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गुरुवारी सायंकाळी लग्नाची वरात प्रार्थनास्थळाजवळ आली असता या दोघांनी डीजे बंद करा, असे सांगितल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. वºहाडातील काही तळीरामांनी त्यांना लाठ्याकाठ्या व चाकूने मारहाण केली. ब्लेडने हातावर वार केले. बघता बघता गावात मोठा जमाव जमला. घटनेची तक्रार देण्यासाठी जमाव अजिंठा पोलीस ठाण्यात गेला. तेथे पोलीस तक्रार घेत असताना काही लोकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. पोलीस व तक्रार देणारे आपला जीव वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यात घुसले. यात काही पोलिसांना मार लागला.पोलिसांकडून लाठीमारपरिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांनी ठाण्यासमोर लाठीमार करून जमाव पांगविला. त्यानंतर सिल्लोड, अजिंठा, फर्दापूर, सोयगाव, औरंगाबाद येथील पोलिसांचा ताफा गावात तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, फौजदार अर्जुन चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Policeपोलिस