शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यात शेतकऱ्यांना फसविणाऱ्या दोन ‘सीएससी’ सेंटरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 13:18 IST

पीक विमा भरूनही फायदा होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती याबाबत कारवाई करू शकते

औरंगाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर आणि कन्नड तालुक्यांतील दोन सीएससींवर (कॉमन सर्व्हिस सेंटर) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ही कारवाई केली असून, शेतकरी पीक विम्याबाबत येणाऱ्या तक्रारी वाढल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पीक विमा, दुष्काळ अनुदान प्रकरणातून राजकारण होऊ नये, यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला विशेष सूचना दिल्याचे वृत्त आहे. गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव देवाशी येथील अशोक वरणे आणि कन्नड तालुक्यातील चांभारवाडी येथील प्रदीप शेवते यांच्या सीएस सेंटरचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 

पीक विमा भरूनही फायदा होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असून, या प्रकरणात शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, विमा कंपनीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली होती. त्या बैठकीनंतर सीएस सेंटरवर तातडीने कारवाई केली. तालुकानिहाय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चौधरी यांनी विमा कंपनीला दिल्या असून, शेतकऱ्यांना पीक विम्यात फसविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी दिला आहे.

कारवाईसाठी अशी आहे समिती शेतकऱ्यांची अडवणूक करून अतिरिक्त पैसे वसूल करणे, विमा कंपनीला पैसे जमा न करणे, अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती याबाबत कारवाई करू शकते, तसेच विभागीय पातळीवरील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आयुक्तांच्या अखत्यारीत पाच सदस्यीय समिती आहे. बोगस सातबारा व पीक फेरा नोंदीच्या आधारे पीक विमा प्रकरणे पुराव्यानिशी निदर्शनास आल्यास त्याप्रकरणी दोषींवर जिल्हा संनियंत्रण समितीच्या मान्यतेने फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार समितीकडे आहेत. 

नुकसानभरपाईचे सूत्र असे...भरपाई रकमेसोबत उंबरठा उत्पन्न वजा करून अपेक्षित उत्पन्न काढण्यात येते. त्याला उंबरठा उत्पन्नाने भागले जाते. त्यानंतर विमा संरक्षित रक्कम व २५ टक्के विमा रक्कम गुणली जाते. ३.५ पट किंवा ३५ टक्क्यांपेक्षा जी जास्त रक्कम जास्त असेल ती रक्कम अदा केली जाते. यापेक्षा जास्त रक्कम असेल, तर केंद्र व राज्य शासन प्रत्येकी ५० टक्के रक्कम समप्रमाणात अदा करते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती