शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस देण्याच्या नियोजनाचा शासनाने मागितला कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:49 IST

सध्या प्रत्येकाचे लक्ष कोरोनाची लस कधी येणार याकडे लागले आहे. ही लस उपलब्ध झाल्यानंतर ऐनवेळी धावपळ उडू नये, यासाठी पूर्व तयारी केली जात आहे. यात लस देण्यासाठी किती कर्मचारी आहेत, किती आरोग्य केंद्रांवरून ती देता येईल, यासंदर्भात शासनाने मनपाला कृती आराखडा मागितला आहे.

औरंगाबाद : सध्या प्रत्येकाचे लक्ष कोरोनाची लस कधी येणार याकडे लागले आहे. ही लस उपलब्ध झाल्यानंतर ऐनवेळी धावपळ उडू नये, यासाठी पूर्व तयारी केली जात आहे. यात लस देण्यासाठी किती कर्मचारी आहेत, किती आरोग्य केंद्रांवरून ती देता येईल, यासंदर्भात शासनाने मनपाला कृती आराखडा मागितला आहे. तर लस ठेवण्यासाठी शासकीय कोल्ड स्टोअरेजसह खाजगी कोल्ड स्टोअरेज घेण्याचे नियोजन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सुरु आहे.

कोरोनाच्या संकटासोबत दोन हात करणाऱ्या जगाला कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. भारतासह विविध देशांत लसीची चाचणी सुरु आहे. त्यामुळे ही लस लवकरच येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिओसह विविध आजारांसाठी सध्या देण्यात येणाऱ्या लसी या लहान मुलांना देण्यात येतात. परंतु कोरोनाची लस लहान बालकांपासून तर वृद्धांपर्यंत अशा सर्वांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे ही उपलब्ध झाल्यानंतर कशा पद्धतीने ती दिली जाईल, यासाठी आतापासूनच नियोजन सुरु केले आहे.

यासाठी शासनाने मनपाला कृती आराखडा मागतिला आहे, असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. येणाऱ्या लसीसाठी ही एकप्रकारे पूर्व तयारी असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येकाला लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे लसींची संख्या जास्त राहणार आहे. त्यासाठी अधिक जागा लागेल. शहरात छावणीत आणि सिडकोतील प्रशिक्षण केंद्रात शासकीय कोल्ड स्टोअरेज आहे. त्याबरोबर खाजगी कोल्ड स्टोअरेज कुठे कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती घेऊन संपर्क साधला जात आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल