करमाड : येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी सकाळी अचानक भेट दिली असता तिथे एकही आरोग्य अधिकारी तसेच ५ कर्मचारीही हजर नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके यांचा पारा चढला. या घटनेची त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून जिल्हा परिषद स्तरावर कारवाईचे आदेश दिले.
बुधवारी सकाळी मीनाताई शेळके यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, नायब तहसीलदार प्रभाकर मुंडे, सहाय्यक गट विकास अधिकारी गायके, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत दाते, रामराव शेळके, सरपंच कैलास उकर्डे आदींनी कोरोना आढावाच्या दृष्टीने तालुक्यातील जयपूर, गेवराई, करमाड, आडगाव खुर्द, शेंद्रा आदी गावांना भेट दिली. यावेळी डॉ. प्रशांत घोडके, डॉ. हाशमी, पंचायत समिती सभापती छाया घागरे, राजू घागरे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या, होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांची परिस्थिती, केले जात असलेले उपाय, मदत व उपचार याबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी कुंभेफळ येथील शिवभोजन केंद्राला देखील त्यांनी भेट दिली.
फोटो - करमाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठकीस उपस्थित असलेल्या जि. प. अध्यक्षा मीना शेळके, रामराव, शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, सरपंच कैलास उकर्डे आदी.