शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

‘जायकवाडी’च्या प्रतिबंधित क्षेत्रात चर खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:49 IST

बळीराजा चिंतेत : उभी पिके वाचविण्यासाठीची धडपड व्यर्थ

पैठण : जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रात पोकलेन लावून पाण्यासाठी चर खोदणाºया मुलानी वाडगाव येथील तीन शेतकऱ्यांना जायकवाडी प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलिसांनी समज देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.जायकवाडी प्रशासनाच्या या कारवाईने शेतकरी अस्वस्थ झाले असून शेतात उभे असलेल्या पिकांना वाचवायचे कसे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.जायकवाडीचा जलसाठा कमी होत असल्याने शेतीसाठी घेतलेल्या विद्युत मोटारीपासून पाणी बरेच दूर गेल्याने विद्युत पंप बंद पडले आहेत. शेतकºयांनी पिकांना पाणी द्यावे म्हणून जायकवाडीच्या जलफुगवटा क्षेत्रात चर खोदण्याचे काम सुरू केले होते. जायकवाडीचे बॅक वॉटर क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात कुठलेही काम करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे या शेतकºयांना जायकवाडी प्रशासनाने कळवून चर खोदण्याचे काम बंद केले आहे.जायकवाडी धरणाची पाणीपातळी सध्या जोत्याखाली गेली आहे. यामुळे बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकºयांनी लावलेल्या मोटारी कोरड्या पडल्या आहेत. शेतातील पिकांना पाणी देता यावे म्हणून शेतकºयांनी जायकवाडीच्या जलसाठ्यातून मोटारीपर्यंत पाणी यावे, म्हणून लोकवर्गणी करून मुलानी वाडगाव परिसरात यांत्रिक मशिनरी लावून चर खोदण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, याबाबत जायकवाडी प्रशासनास खबर मिळताच कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी संबंधित शेतकºयांना चर खोदण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असा अर्ज बिडकीन पोलिस ठाण्यात दिला होता. या अजार्नुसार सय्यद अफसर सय्यद अब्दुल, राजू हरिभाऊ मिसाळ व रामकिसन शिवाजी शेळके यांना पोलिसांनी समज देऊन जायकवाडीच्या बॅक वॉटर क्षेत्रामध्ये सुरू असलेले काम बंद केले आहे.कोट....शेतकरी म्हणतात... पाणी परवाना घेतलाआम्ही शासनाचा रितसर पाणी परवाना भरला आहे. धरणातील पाणी कमी झाल्याने आम्ही व इतर गावातील लोकांनी मिळून लोकवर्गणीतून जायकवाडी धरण जलफुगवटा क्षेत्रात पोकलेन लावून माती काढत होतो. असे केले नाही तर आमची पिके जळून जातील, मग आम्ही पाणी पाणी परवानगी घेऊन आमचा काय उपयोग आहे, अशी प्रतिक्रिया या शेतकºयांनी दिली.जायकवाडी प्रशासनाची कारवाईगोदावरीच्या उर्ध्व खोºयातून जायकवाडी धरणासाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर सदरील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावेळी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जायकवाडी धरणात पाण्याची गळती जास्त असून अवैध उपसा कनेक्शन जास्त असल्याचे म्हटले होते. जायकवाडी प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात अवैध कनेक्शन रोखण्यासाठी तत्पर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार महावितरण, महसूल, पोलीस व जायकवाडी प्रशासन यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने इसारवाडी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी २४ अवैध विद्युत पंपाचे कनेक्शन तोडून जप्तीची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईत अवैध कनेक्शनद्वारे इस्ट वेस्ट सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्याने दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी या कंपनीस नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली. कंपनीने कारवाईनंतर पाणी उचलण्यासाठी रितसर अर्ज केला असल्याचे सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.जायकवाडीच्या बुडीत क्षेत्रात पथक तैनातजायकवाडीच्या बुडीत क्षेत्रात येणाºया परिसरात गस्ती पथक तैनात करण्यात आले असून या पथकाद्वारे संपूर्ण क्षेत्रात नजर ठेवली जाणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. जायकवाडी धरणाचा परिसरातील शेतकºयांनी पाणी परवाना घेतलेला असून पाणी उचलण्याचा त्यांना अधिकार आहे. राज्य वन्यजीव मंडळाकडे याबाबत शेतकºयांच्या वतीने अर्ज करून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे दत्ता गोर्डे, बप्पा शेळके, तुषार शिसोदे यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात