शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

नवीन आराखड्यानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग; राजकीय पक्ष, इच्छुक लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 19:22 IST

नवीन आराखड्यानुसार एक वॉर्ड ९ ते १० हजार लोकसंख्येचा असणार आहे. ३ वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास ३० हजार असेल.

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी निकाली निघाली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे शहरात १२६ वॉर्ड तयार केले. ४२ प्रभागांचा आराखडा सादर केला.

नवीन आराखड्यानुसार एक वॉर्ड ९ ते १० हजार लोकसंख्येचा असणार आहे. ३ वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास ३० हजार असेल.राज्य निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्यातील २२ महापालिकांसाठी स्वतंत्र सुधारित आदेश काढला. औरंगाबाद महापालिकेलाही नोव्हेंबर महिन्यात कच्चा आराखडा तयार करून आयोगाकडे सादर करावा, असे म्हटले. त्यानुसार मनपा प्रशासनाने आराखडा सादर केला आहे. पूर्वी मनपातील सदस्यांची संख्या ११५ होती. आता १२६ करण्यात आली असून प्रभागांची संख्या ४२ झाली आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार २,२८६ प्रगणक गट असल्यामुळे त्यातूनच वॉर्ड आणि प्रभाग तयार करण्यात आले. १२ लाख २८ हजार ३२ इतकी लोकसंख्या, ९ लाख ३९ हजार ४५८ मतदारसंख्या गृहीत धरण्यात आली. १२६ वॉर्डांपैकी ६३ वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील.

नवीन प्रभाग रचनेत २४ एससी, ३ एसटी, ३४ ओबीसी आणि ६५ सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य राहतील, असा अंदाज आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया अशक्य आहे. आयोगाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर आराखडा प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. आक्षेप व सूचना विचारात घेऊन प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम केला जाईल. त्यानंतर प्रभाग रचनेतील वॉर्डनुसार नव्याने आरक्षण सोडत काढली जाईल.

२०१५ मधील पक्षीय बलाबलशिवसेना- २९भाजप- २३एमआयएम- २४काँग्रेस- ११बहुजन समाज पार्टी- ५राष्ट्रवादी काँग्रेस- ४रिपाइं (डेमोक्रॅटिक)- २अपक्ष- १७एकूण - ११५

आयोगाने दिलेली लोकसंख्या-१२,२८,०३२अनुसूचित जाती लोकसंख्या- २,३८,१०५अनुसूचित जमाती - १६,३२०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका