माजलगाव : नियोजित वरासह दुचाकीवरून गेलेल्या येथील सोनाली उर्फ रिंकू मोतीराम नाईकनवरे (१७) हिच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. लग्नास नकार दिल्यामुळे नियोजित वरानेच तिचा ओढणीने गळा आवळल्याची माहिती शनिवारी समोर आली.९ जानेवारी रोजी सोनाली आजीसोबत दवाखान्यात आली होती. प्रशांत खराडे याने तिला दुचाकीवरून धारूर घाटात नेले. या दोघांचा साखरपुडा महिनाभरापूर्वी झाला होता. २ फेब्रुवारी रोजी ते विवाहबद्ध होणार होते. मात्र, धारूर घाटात सोनालीने मला तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा नाही, असे त्याला स्पष्टच सांगितले. त्यामुळे त्याने ओढणीने गळा आवळून खून केला. तशी कबुलीही त्याने दिल्याचे फौजदार विकास दांडे यांनी सांगितले.संशयाची सुई कायममयत सोनाली उर्फ रिंकूच्या खुनाच्या आरोपाखाली नियोजित वर प्रशांत पोलीस कोठडीत आहे. मात्र, त्याच्याशी लग्न करायचे नव्हते तर दुचाकीवर बसून सोनाली त्याच्यासोबत का गेली ? हा प्रश्न निरूत्तरीत आहे.दरम्यान, प्रकरणाचा तपास फौजदार दांडे यांच्याकडून सहायक अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांच्याकडे सोपविला आहे. (वार्ताहर)
लग्नास नकार दिल्याने सोनालीचा आवळला गळा
By admin | Updated: January 15, 2017 01:03 IST