शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
2
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
3
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
4
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
5
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
6
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
7
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
10
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
11
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
12
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
13
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
15
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
16
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
17
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
18
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
19
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
20
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

एसी बंद; रक्तपुरवठा थांबला !

By admin | Updated: April 11, 2017 00:10 IST

लातूर : सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीची वातानुकूलित यंत्रणा तीन दिवसांपासून बंद पडल्याने तेथून होणारा पीसीव्ही अंतर्गतचा रक्तपुरवठाच बंद झाला आहे.

लातूर : चैत्रातच वैशाख महिन्यासारखा वनवा पेटला आहे. त्यामुळे जीवाची घालमेल होत आहे. परिणामी, रक्तदान करण्याचे प्रमाण घटले आहे. त्यातच शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीची वातानुकूलित यंत्रणा तीन दिवसांपासून बंद पडल्याने तेथून होणारा पीसीव्ही अंतर्गतचा रक्तपुरवठाच बंद झाला आहे. त्याचबरोबर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये आवश्यकतेच्या तुलनेत रक्त पिशव्या उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे.सध्या परीक्षांचा कालावधी आहे. त्याचबरोबर वाढत्या उन्हामुळे काही रक्तदाते वगळता अन्य लोकांनी रक्तदानाकडे पाठच फिरविली आहे. परिणामी, शहरात गेल्या १५ दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाअंतर्गत रक्तपेढी आहे. तसेच एमआयटी, डॉ. भालचंद्र ब्लड बँक, अर्पण आणि माऊली ब्लड बँक अशा पाच रक्तपेढ्या आहेत. परंतु, या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयाअंतर्गतच्या रक्तपेढीतील वातानुकूलित व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी, या रक्तपेढीतून होणारा रक्तपुरवठा बंद झाला आहे. वास्तविक पाहता या रक्तपेढीतून सर्वोपचारमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना, इतर खासगी रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांनी रक्तदानाचे कार्ड दिल्यास मोफत रक्तपुरवठा केला जातो. त्याचबरोबर सर्वोपचारच्या नियमानुसार शुल्क घेण्याबरोबर एक रक्तदाता उपलब्ध झाल्यानंतर रक्त पिशवीचा पुरवठा केला जातो. परंतु, वातानुकूलित यंत्र बंद झाल्याने पीसीव्हीअंतर्गत रक्तपुरवठा बंद झाला आहे. या रक्तपेढीतून व्होल ब्लड उपलब्ध करून दिले जात आहे.