शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोज लागतोय तब्बल ६० टन ऑक्सिजन; गतवर्षी संपूर्ण एप्रिलमध्ये लागलेला ऑक्सिजन आता २ दिवसातच संपतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 16:57 IST

About 60 tons of oxygen is needed daily गतवर्षी संपूर्ण एप्रिल महिन्यात लागला होता १३९.९६ टन ऑक्सिजन

ठळक मुद्देऔरंगाबादेत गेल्या दीड महिन्यातच ५० हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गतवर्षी कोरोना रुग्णांची आणि उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित होती.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रकोपाने औरंगाबाद जिल्हा ‘ऑक्सिजन’वर आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रोज तब्बल ६० टन ऑक्सिजन लागत आहेत. गतवर्षी एप्रिल २०२०मध्ये संपूर्ण महिनाभरात १३९.९६ टन ऑक्सिजन लागला होता. पण सध्या एवढा ऑक्सिजन जवळपास दोन दिवसातच संपत आहे. रोज मागणी वाढतच असल्याने पुढील काही दिवसात ऑक्सिजनची स्थिती चिंताजनक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

औरंगाबादेत गेल्या दीड महिन्यातच ५० हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. रोज एक हजारांवर रुग्णांचे निदान होत आहे. त्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील २,१५८ ऑक्सिजन खाटा रुग्णांनी भरल्याची स्थिती आहे. २६२ व्हेंटिलेटरही अपुरे पडत आहेत. त्याचबरोबर २,८७४ रुग्ण गृह अलगीकरणात असून, यातील अनेक रुग्णही ऑक्सिजनवर आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

गतवर्षी कोरोना रुग्णांची आणि उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित होती. आता रुग्णसंख्या आणि रुग्णालये दोन्हींची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्णालयांतील टँक रिकामे होऊन रुग्णांचा जीव धोक्यात जाण्याचे टाळण्यासाठी लिक्विड ऑक्सिजनची मागणी आधीच करून ठेवावी लागत आहे. ऑक्सिजन सिलिंडरची संख्या कमी पडत असल्याची स्थिती आहे. घाटीत रोज १५ किलो लीटर (केएल) लिक्विड ऑक्सिजन लागत आहे. घाटीत ४८२ गंभीर रुग्ण दाखल आहेत. रुग्णांची ही संख्या पाहता, ऑक्सिजनचा भरलेला टँकर कायम उभा राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे.

जिल्ह्याला विविध ठिकाणांहून होतो ऑक्सिजनचा पुरवठावाळूज येथील दोन आणि गेवराई तांडा, शेंद्रा येथील दोन अशा चार पुरवठादारांकडून जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यात एअर काॅम्प्रेसरद्वारे हवेतील ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरले जाते आणि त्यानंतर या सिलिंडरचा रुग्णालयांना पुरवठा केला जातो. तर टँकरद्वारे लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. चाकण-पुणे, रायगड, ठाणे आदी ठिकाणाहून औरंगाबादेत लिक्विड ऑक्सिजन येते.

मागणीत होतेय वाढऔरंगाबादेत ऑक्सिजनच्या मागणीत दररोज वाढ होत आहे. आजघडीला रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. सध्या पुरवठा सुरळीत आहे. पुढील दिवसात किती ऑक्सिजन लागेल, याचा आढावा घेऊन नियोजन केले जात आहे.- मिलिंद काळेश्वरकर, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषधे)

अशी वाढली ऑक्सिजनची मागणी- २१ फेब्रुवारी - ८ टन रोज- ६ मार्च - १५ टन रोज- १ एप्रिल - ५४ टन रोज- १५ एप्रिल - ६० टन रोज

एप्रिल २०२०मध्ये लागला १३९.९६ टन ऑक्सिजन.सध्या रोज ६० टन ऑक्सिजन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद