शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंत सुमारे २०० अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:21 IST

अस्तित्वात असलेल्या सर्व्हिस रोडचा घोटलाय गळा

ठळक मुद्देसिडको बसस्थानकासमोर टपऱ्या, ‘काळीपिवळी’चे बस्तानजळगाव रस्त्यावर केवळ उजव्या बाजूने सर्व्हिस रोड 

औरंगाबाद : सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंट या जळगाव रस्त्यावर दोन्ही बाजूंनी हरित पट्टे (ग्रीन बेल्ट) आणि सर्व्हिस रोडवर सुमारे २०० अतिक्रमणे झाल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. अतिक्रमणधारकांनी थाटलेली दुकाने व वाहनतळांमुळे ग्रीन बेल्टचे नुकसान झाले असून, काही ठिकाणचा सर्व्हिस रस्ताच गिळून टाकला आहे.

बीड बायपासवर सतत प्राणान्तिक अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेतल्याने तेथील अतिक्रमणांवर महापालिकेने थेट कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे बायपाससाठी सर्व्हिस रस्त्याचा मार्ग मोकळा झाला. अशाच प्रकारचे अतिक्रमण शहरातील जळगाव रस्त्यावर हॉकर्स आणि मालमत्ताधारकांनी केले आहे. जळगाव टी-पॉइंट ते हर्सूल टी-पॉइंटदरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजंूनी अनधिकृत दुकाने थाटली आहेत. 

सिडको बसस्थानकासमोर टपऱ्या, ‘काळीपिवळी’चे बस्तानसिडको बसस्थानकासमोरील ग्रीन बेल्टचे रूपांतर व्यापारीपेठेत केल्याचे दिसून येते. जळगाव टी-पॉइंट चौक ते सिडको एन-१ चौकादरम्यान खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ४० टपऱ्या आहेत. शिवाय तेथे काळीपिवळी जीपचालक आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, टेम्पो ट्रॅव्हलर आणि अन्य खाजगी वाहने मोठ्या संख्येने उभी असतात. या वाहनांमुळे तेथील संपूर्ण ग्रीन बेल्ट नष्ट झाला. विशेष म्हणजे या लोकांविरोधात महापालिकेच्या वतीने चार महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचा कोणताही परिणाम अतिक्रमणधारकांवर झालेला नाही. 

ग्रीन बेल्टमध्ये गॅरेज, रसवंतीजळगाव रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यादरम्यान असलेल्या ग्रीन बेल्टवर काही स्वयंसेवी संस्था आणि दुकानदार, हॉटेल्सचालकांनी झाडे लावून छोटी-छोटी उद्याने विकसित केली.   उर्वरित जागेवर अतिक्रमणे करून खाद्यपदार्थांची दुकाने, रसवंती आणि गॅरेजही थाटली आहेत. आंबेडकर चौक आणि सिडको स्टॅण्डलगतच्या दारू दुकानासमोरील ग्रीन बेल्टवर शेकडो मद्यपी तेथे बसून दारू पितात. 

जळगाव रस्त्यावर केवळ उजव्या बाजूने सर्व्हिस रोड संपूर्ण जळगाव रस्त्याच्या उजव्या बाजूने सर्व्हिस रोड आणि ग्रीन बेल्ट अस्तित्वात आहे, तर डाव्या लेनशेजारी सिडको बसस्थानक ते काळा गणपती मंदिरापर्यंत सर्व्हिस रोड आहे.  तेथून पुढे आंबेडकरनगरपर्यंत  एमआयडीसी एरिया असल्याने तेथे सर्व्हिस रोड आणि ग्रीन बेल्ट नाही. डाव्या बाजूने काही स्वयंसेवी संस्थांनी ग्रीन बेल्टमध्ये झाडे लावली असून, त्यांचे संगोपनही ते व्यवस्थित करीत आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमणcidco aurangabadसिडको औरंगाबाद