शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

विरोधकांची तटबंदी तोडत अब्दुल सत्तारांचा विजयी चौकार; सुरेश बनकरांची कडवी झुंज निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:41 IST

- श्यामकुमार पुरे सिल्लोड : सिल्लोड -सोयगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी ...

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बाजी मारून इतिहास घडविला आहे. विशेष म्हणजे सत्तार यांचा या मतदारसंघातून हा चौथ्यांदा विजय झाला आहे.

१ लाख ३७ हजार ९६० मते मिळवित २ हजार ४२० अधिक मते घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांचा सत्तार यांनी पराभव केला. बनकर यांना १ लाख ३५ हजार ५४० मते मिळाली आहेत. दरम्यान, बनकर यांनी फेरमतमोजणी करण्याचा अर्ज दिला होता, मात्र निवडणूक निर्वाचन अधिकारी लतीफ पठाण यांनी तो फेटाळून लावला. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता निकाल घोषित करण्यात आला. या मतदारसंघात एकूण २ लाख ८६ हजार ६८२ मतदान झाले होते. त्यात टपाली मतदान २ हजार ७८५ होते. परंतु त्यातील १५५ मतदान बाद झाले.

सकाळी ८ वाजेपासूनच फेरीअखेर मतांचा आकडा जसा बाहेर येत होता, तशी तशी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची धाकधूक वाढत होती. शेवटी सत्तार यांचा २ हजार ४२० मतांनी विजय झाला. त्यानंतर सत्तार समर्थकांनी मतदारसंघात फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशे, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत जल्लोष साजरा केला. याशिवाय सिल्लोड शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते बायपास रोड व नंतर शहराच्या मुख्य रस्त्याने सत्तार यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

उमेदवारांना मिळालेली एकूण मतेउमेदवार             पक्ष             मिळालेली मतेअब्दुल सत्तार, महायुती १ लाख ३७ हजार ९६०.सुरेश बनकर, महाविकास आघाडी, १ लाख ३५ हजार ५४०.संघपाल सोनवणे, बहुजन समाज पार्टी, १ हजार १३५.बनेखा पठाण, वंचित बहुजन आघाडी, १ हजार ९८९.राजू अफसर तडवी भारतीय ट्रायबल पार्टी, १६२.शेख उस्मान शेख ताहेर, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, १४१.अनिल मदन राठोड, अपक्ष ३६६.राजू अफसर तडवी, अपक्ष १६२.अरुण चिंतामण चव्हाण, अपक्ष, ९१.अशोक विठ्ठल सोनवणे, अपक्ष १२२.दादाराव श्रीराम आळणे, अपक्ष, २१०.राजू अशोक गवळी, अपक्ष, १६६.परीक्षित माधवराव भरगाडे, अपक्ष, ३३९सुरेश पांडुरंग बनकर, अपक्ष, ९०७.भास्कर शंकर सरोदे, अपक्ष, १ हजार ५७०.रफिक मनव्वरखान पठाण, अपक्ष १६१२.राजू पांडुरंग साठे, अपक्ष, १८३०.राहुल अंकुश राठोड, अपक्ष, २७०५.विकास भानुदास नरवडे, अपक्ष ३४०.शरद अन्ना तिगोटे, अपक्ष १५१.शेख मुख्तार शेख सादिक, अपक्ष, २६७.श्रावण नारायण शिनकर, अपक्ष ७६.सचिन दादाराव हावळे, अपक्ष ५२८.संदीप एकनाथ सुरडकर, अपक्ष, ३०२.अफसर अकबर तडवी, अपक्ष ७८नोटा ७२५

विजयाची कारणे१) सत्तार यांच्याकडे असलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी. तगडा जनसंपर्क, सर्व शक्ती पणाला लावली.२) विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढविली, मतदारसंघात राबविलेल्या योजना, लाडक्या बहिणींनी साथ दिली.३) गावागावात केलेले योग्य नियोजन.

पराभवाची कारणेमतदारसंघात योग्य नियोजन झाले. परंतु ग्रामीण भाग व सिल्लोड शहरातील विशेषत: मुस्लीम समाजाची मते मिळविता आली नाहीत. याबाबत बनकर मागे राहिले. याउलट अब्दुल सत्तार यांच्यासोबत मुस्लीम मतदार खंबीरपणे राहिले. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि इतर मुस्लीम अपक्ष उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाले. बनकर यांनी शेवटपर्यंत सत्तार यांच्यासोबत जबरदस्त लढत दिली. परंतु अखेर बनकर यांचा निसटता पराभव झाला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAbdul Sattarअब्दुल सत्तारsillod-acसिल्लोड