शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! सात वर्षांत दीड पटीने वाढले थॅलेसेमियाग्रस्त; दर महिन्याला रक्त घेण्याची नामुष्की

By संतोष हिरेमठ | Updated: May 8, 2023 18:49 IST

जागतिक थॅलेसेमिया दिन :दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत असून, बालकांचे प्रमाण जास्त आहे.

छत्रपती संभाजीनगर : शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने थॅलेसेमिया हा आजार होतो. त्याबरोबरच दोन ‘मायनर थॅलेसेमिया’ग्रस्तांनी विवाह केला तर जन्माला येणारे मूल ‘थॅलेसेमिया मेजर’ राहण्याची शक्यता असते. अशा मुलांना दर महिन्याला रक्त द्यावे लागते. चिंताजनक म्हणजे गेल्या सात वर्षांत थॅलेसेमियाग्रस्तांच्या संख्येत दीड पटीने वाढ झाली आहे.

दरवर्षी ८ मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळण्यात येतो. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत असून, बालकांचे प्रमाण जास्त आहे. मराठवाड्यात या रुग्णांची संख्या सुमारे बाराशेवर आहे. या रुग्णांना १५ ते २५ दिवसांनी रक्त द्यावे लागते. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने हा आजार होतो.

किती वाढले रुग्ण?थॅलेसेमिया सोसायटी सचिव अनिल दिवेकर म्हणाले, आमच्याकडे २०१६ मध्ये १७० थॅलेसेमियाग्रस्तांची नोंद झाली होती. संख्या आता तीनशेवर गेली आहे. अगदी सहा महिन्यांच्या शिशूचीही नोंद झाली. या सर्वांना नियमितपणे रक्त द्यावे लागते. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आठशेच्या घरात आहे.

जनुकीय आजारथॅलेसेमिया हा जनुकीय आजार आहे. रुग्णाला संपूर्ण आयुष्य १५-२० दिवसांच्या अंतराने रक्त द्यावे लागते. बाह्य रक्ताच्या नियमित पुरवठ्याने रक्तातील लोहाचे प्रमाण मर्यादेपलीकडे वाढते. त्यामुळे अतिरिक्त औषधांची गरज असते.

- डाॅ. मंजुषा कुलकर्णी, संचालक, दत्ताजी भाले रक्त केंद्र

जीन्समध्ये असामान्यतालाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबीनच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या जीन्समध्ये असामान्यता हे थॅलेसेमियाचे कारण आहे. आनुवंशिक दोष वारसाने येतो. जीन्समध्ये असलेल्या या असामान्यतेचे निम्मे प्रमाण दोन्ही पालकांमध्ये असल्यास (थॅलेसेमिया ट्रेट) यांच्या अपत्यामध्ये २५ टक्के हा आजार उद्भवतो, तर ५० टक्के अपत्ये कॅरिअर्स (निम्मे दोषवाहक) असतात.- डॉ. अभिषेक परळीकर, बालरोगतज्ज्ञ

थॅलेसेमियाची लक्षणे...- लाल रक्तपेशींच्या क्षतीमुळे गडद रंगाची लघवी होणे.- थकवा.- पिवळी किंवा निस्तेज त्वचा.- उशिरा आणि संथ वाढ.- अंगावर सूज येणे.- कॅरिअर्समध्ये या रोगाची नगण्य चिन्हे दिसतात किंवा चिन्हे दिसतही नाहीत.

थॅलेसेमिया कसा टाळावा?- जनसामान्यांमधील थॅलेसेमिया ट्रेट (निम्मे दोष असलेले) ओळखावेत.- दोन थॅलेसेमिया ट्रेट यांच्यात विवाह टाळावा.- विवाहित जोडपे थॅलेसेमिया ट्रेट असल्यास गर्भधारणा झाल्यावर गर्भ चाचणीद्वारे थॅलेसेमियाचे लवकर निदान करावे.- नाते संबंधामध्ये विवाह टाळावा.

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबाद