शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अबब... सिझेरियन दरम्यान बाळाच्या वजनाइतकीच काढली गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 17:02 IST

खासगीत लाखभर रुपयांत होणारी शस्त्रक्रिया झाली मोफत

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : एखादी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया म्हटली की सरकारी रुग्णालयात होणार नाही, असाच अनेकांचा समज आहे. मात्र, सिझेरियन प्रसूतीदरम्यानच जवळपास नवजात बाळाच्या वजनाइतकीच गाठ काढत जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया केली. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी किमान लाखभर रुपये लागले असते. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात ती अगदी मोफत झाली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात चिकलठाणा परिसरातील एक २६ वर्षीय महिला गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात नियमित तपासणीसाठी आली होती. तेव्हा तिच्या अंडाशयात गाठ असल्याचे निदान झाले. गरोदरपणामुळे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया लगेच करणे शक्य नव्हते, तसेच गर्भपात करणेही अशक्य होते. त्यामुळे गरोदरपणाचे पूर्ण ९ महिने पूर्ण होईपर्यंत महिलेची नियमित तपासणी करण्यात आली. यादरम्यान गाठ आणखी वाढतच गेली. गरोदरपणाचे ९ महिने पूर्ण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. अखेर ९ फेब्रुवारी रोजी ही सिझेरियन प्रसूती पार पडली. सिझेरियननंतर लगेच गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. कविता जाधव यांनी ही शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डाॅ. संजय चव्हाण, परिचारिका ज्योती सुळके, मीना पोटे, भारती निर्मळ, सुनीता घोरपडे यांनी मदत केली.

बाळाचे अन् गाठीचे वजन किती?नवजात बाळाचे वजन अडीच किलो आहे, तर अंडाशयातील झालेली गाठ ही दोन किलो वजनाची होती. ही गाठ तशीच ठेवली असती तर पुढे महिलेच्या जीविताला धोका नाकारता येत नव्हता. त्यामुळे सिझेरियनबरोबरच गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळ आणि माता सुखरूप असून, लवकरच त्यांना सुटी दिली जाणार आहे, असे डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpregnant womanगर्भवती महिला