शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! बँकांत साठल्या १०० कोटींच्या खराब नोटा; ८ महिन्यांतील एकट्या औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:09 IST

या खराब नोटांमध्ये २ हजार, ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये, २० रुपये व १० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेला पाठविल्या ३४ कोटींच्या नोटा१०० रुपये, १० रुपये, व ५ रुपयांच्या नोटा सर्वाधिक आहेत

औरंगाबाद : हाताळून हाताळून खराब झालेल्या नोटा ग्राहक बँकांमध्ये जमा करतात. या थोड्या थोड्या नोटा मिळून बँकामध्ये मागील ८ महिन्यांत ढिगार निर्माण झाला आहे. तब्बल १०० कोटी रुपये मूल्याच्या खराब नोटांची आजघडीला बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये थप्पीवर थप्पी लागली आहे. ही आकडेवारी एका जिल्ह्यातील आहे. असे देशभरातील बँकांमध्ये यंदा किती खराब नोटा जमा झाल्या असतील, याची आकडेवारी रिझर्व्ह बँकेने अजून जाहीर केली नाही. 

या खराब नोटांमध्ये २ हजार, ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये, २० रुपये व १० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. यातही १०० रुपये, १० रुपये, व ५ रुपयांच्या नोटा सर्वाधिक आहेत. एसबीआयच्या करन्सी चेस्टमध्येच सुमारे ९० कोटींच्या  खराब नोटा जमा आहेत. त्यातील ३४ कोटी ६० लाख रुपयांच्या खराब, जीर्ण नोटा मागील महिन्यात रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आल्या आहेत. स्वच्छ नोटा राखणे  हे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे. त्यामुळे  प्रत्येक बँकेला ग्राहकांकडील खराब नोटा घेण्याचे व त्याबदल्यात नवीन नोटा देण्याच आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.  पण काही बँका आपली जबाबदारी झटकून खातेदारांना  खराब नोटा बदलण्यासाठी  एसबीआयकडे पाठवत असल्याचे दिसून आले. जीर्ण नोटा बदलून घेणे हा ग्राहकांचा अधिकारच आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी संपूर्ण खराब , जीर्ण नोटांचा पंचनामा करतात व त्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवतात. त्या नोटा परत चलनात येऊ नये म्हणून त्या जाळून टाकण्यात येतात. 

१०  कोटींची नाण्याची थप्पीबँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १० रुपये मूल्याची नाणी ग्रामीण भागात अजूनही स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केले आहे की, १० रुपयांची नाणी चलनात आहे. ग्राहक नाणी बँकेत आणून देतात पण घेऊन जात नाहीत. यामुळे एसबीआयकडे १० कोटी मूल्यांची नाणी बँकेत धूळ खात आहे.

टॅग्स :MONEYपैसाbankबँकAurangabadऔरंगाबाद