शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा झाली कार्यरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:21 IST

: अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. नुकतीच एक बैठक नागसेनवनात होऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी मधुसूदन गायकवाड हे होते.

औरंगाबाद : अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. नुकतीच एक बैठक नागसेनवनात होऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी मधुसूदन गायकवाड हे होते.अ.भा. दलित नाट्य परिषदेची स्थापना ३४ वर्षांपूर्वी झाली. प्रा. साहेबराव गायकवाड, मधू गायकवाड, प्रा. अविनाश डोळस, प्रकाश त्रिभुवन, प्रा. विजयकुमार गवई, डॉ. सदाशिव पंडित आदींनी सुरुवातीला दलित थिएटर स्थापन करून नाट्य चळवळ सुरू केली होती. ‘गाव नसलेलं गाव’, ‘थांबा रामराज्य येतंय’ ही नाटके या काळात खूपच गाजली. ‘थांबा राम राज्य येतंय’ची ३५० च्या वर प्रयोग झाले. पुढे ‘आवर्त, मुल्याटो, सत्यमेव जयते, एक होता राजा, युगयात्रा, नित्याची गोष्ट, वाटा पळवाटा, देव नवरी, आठवणीचे पक्षी, आंबेडकरी जलसा, हा माझा देश व स्वातंत्र्य कंच्या गाढीवचं नाव’ ही पथनाट्यही सादर करण्यात आली. पुढे काही कलावंत मंडळी वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या दिशेला गेली आणि दलित थिएटर नावाच्या संस्थेचा प्रवस मंदावला. पुढे १९८७ ला अ.भा. नाट्य परिषद स्थापन झाली व परिषदेने १० नाट्य संमेलने आयोजित केली. मंदावलेली नाट्य चळवळ पुन्हा जोमाने चालावी यासाठी व बुद्धाचा समतेचा व बाबासाहेबांचा संविधानातील विचार या नाट्य चळवळीद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरले.बैठकीस नागपूरचे प्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारी, दादाकांत धनविजय, अशोक जांभूळकर, मुंबईचे प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, के.बी. ब्राह्मणे, आशुतोष नाटकर, विलास गवळी, अशोक गायकवाड, दिलीप म्हस्के, तुळशीराम मोरे, औरंगाबादचे प्रा. प्रभाकर शिरोळे, प्रा. विजयकुमार गवई, प्रा. प्रकाश सिरसाट, प्रा. दिलीप बडे, नामेदव जोगदंड, प्रकाश त्रिभुवन, प्रा. दिलीप साळवे, भीमराव वाघचौरे, मधू काळे, बाजीराव साळवे, सिद्धार्थ निकाळजे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादartकला