शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

अंगणवाडीसेविकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:42 AM

असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग स्थापन करून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी जि.प. परिषदेवर ‘आयटक’ संलग्नित अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देजनजागरण मोहिमेला सुरुवात : जिल्हा परिषदेचा परिसर घोषणाबाजीने दणाणला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग स्थापन करून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी जि.प. परिषदेवर ‘आयटक’ संलग्नित अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला.‘आयटक’ संघटनेतर्फे केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जनजागरण मोहीम ९ आॅगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान आयोजित केली आहे. मराठा आरक्षणासाठी क्रांतिदिनी बंद पुकारण्यात आलेला असल्यामुळे या मोहिमेचा शुभारंभ औरंगाबादेत बुधवारी (दि.८) झाला. ‘आयटक’शी संलग्न असलेल्या अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेतर्फे भाकपच्या कार्यालयापासून जि.प.वर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला जिल्हा महिला बालविकास अधिकारी बी.ए. सावंत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा पैठणगेट, औरंगपुरामार्गे जि.प.वर पोहोचला. यावेळी अंगणवाडी सेविका, आशांनी ‘संघ-भाजप हटाव’, ‘पंकजाताई आमच्या फाईल कुठे गेल्या, जबाब दो’, ‘सरकार चले जाव’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनात आयटकचे जिल्हाध्यक्ष प्रा. राम बाहेती, अ‍ॅड. अभय टाकसाळ, अनिल जावळे, तारा बनसोडे, मीरा अडसरे, माया भिवसने, विजया गठडी, शन्नो शेख, ललिता दीक्षित, रंजना राठोड, विमल खरात, शीला साठे, सुनीता गवळीकर, सुनीता शेजवळ, मुरली म्हस्के, कांता पानसरे, प्रमिला सोनवणे, सीमा व्यवहारे, सुधा जोशी, ऊर्मिला नरवडे, मंगल धत्तिंगे, ज्योती गायकवाड, कविता वाहूळ, मल्लिका वालेकर, सीमा व्यवहारे आदींची उपस्थिती होती.या आहेत मागण्याअसंघटित क्षेत्रातील कर्मचाºयांना १८ हजार रुपये वेतन द्यावे, लाईट लिस्टिंगची कामे अंगणवाडी कर्मचाºयांना देण्यात येऊ नयेत, रजिस्टर स्टेशनरी साहित्याचा पुरवठा करावा, अंगणवाडीसेविका व मदतनिसांच्या जागा त्वरित भराव्यात आदी मागण्यांचे निवेदन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना दिले.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद