शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

स्पर्धा परीक्षांची पुस्तक घेऊन फिरणाऱ्या तरुणाची अचानक गाड्यांवर दगडफेक

By राम शिनगारे | Updated: March 15, 2023 19:12 IST

जमावाने दिला बेदम चोप; मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : बाबा पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलावरून खाली उतरल्यानंतर रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगातील पाच ते सहा गाड्यांवर एका उच्चशिक्षीत माथेफिरूने दगडफेक केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता घडली. दगडफेक करणाऱ्या युवकाकडे स्पर्धा परीक्षांची पुस्तके आढळुन आली. या प्रकरणी एका गाडीचालकाने दिलेल्या तक्रारीवरून माथेफिरूच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

संजय मगण गांगे (रा. गल्ली नंबर २, मुकुंदवाडी) असे दगड मारणाऱ्याचे नाव आहे. पराग मोहन गुजराती हे डीसीबी बँकेत व्यवस्थापक आहेत. ते बुधवारी सकाळी चारचाकी गाडीतुन (एमएच २० जीई ४५९२) जात असताना उड्डाणपुल संपल्यानंतर गॅसपंपाच्या बाजूलाच पद्मपुराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक मोठा दगड त्यांच्या गाडीच्या काचाच्या दिशेने आला. यात गाडीची समोरची काच फुटली. राजाराम बाबुराव दिंडे यांच्या गाडीवर (एमएच २० ईवाय ८२४२) ही दगड मारला. त्याशिवाय एमएच ०४ एफआर ३७९८ या गाडीसह इतर तीन गाड्यांच्याही काचांवर दगड मारण्यात आले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली. जमावाने पकडलेल्या तरुणाकडे इंग्लिश स्पिकींग कोर्ससह स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही आढळून आली आहेत. संजय गांगे याच्यावर मानसिक परिणाम झालेला असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली.

नागरिकांनी दिला चोपयेणाऱ्या गाड्यांच्या काचांवर दगड मारणाऱ्या माथेफिरू संजय गांगे यास जमलेल्या नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. त्याचवेळी पोलिसांची गाडी बोलावून घेत त्यांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली. त्यात त्याने नशा केलेली नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिस ठाण्यात आणल्यानंतर गांगे यास पोलिसांनी पिण्यासाठी पाणी दिले. बाटलीतील पाणी पिल्यानंतर शिल्लक राहिलेले काही पाणी पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर टाकल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद