शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शरीर सुखाची मागणी करीत महिलेला बेदम मारहाण

By राम शिनगारे | Updated: April 23, 2023 19:49 IST

राजकीय पदाधिकाऱ्याचे कृत्य : छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : माझ्यासोबतच शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला चाकूने भोसकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चारचाकी गाडीतच बेदम मारहाण झाल्याचा प्रकार २२ एप्रिल रोजी सायंकाळी लक्ष्मी कॉलनी येथील बारापुल्ला गेटजवळ घडला. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात राजकीय नेता जयकिशन कांबळे (रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयकिशन कांबळे याने एका महिलेस फोन करून बोलावून घेतले. महिला तिच्या मामाच्या मुलीसोबत कांबळे यास भेटण्यास गेली. तेव्हा त्याने कारमध्ये बसण्यास सांगितले. कारमध्ये त्याने माझ्यासोबतच संबंध ठेव, माझ्यासोबत चल, तु मला पाहिजे आहेस. माझ्यासोबत आली नाहीस तर तुला भोसकून टाकीन अशी धमकी दिली. गाडीतुनच बसूनच फिर्यादीला डीमार्टमध्ये घेऊन गेला.

फिर्यादी आतमध्ये गेल्यानंतर तीला बाहेर येण्यास उशीर झाला. फिर्यादी डीमार्टमधून उशीरा बाहेर आल्यामुळे कांबळे याने तीला शिविगाळ करीत हातचापटाने बेदम मारहाण केली. तया तिच्या दोन्ही डोळ्यालाही मार लागला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास छावणी पोलिस करीत असल्याची माहिती निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिली.आरोपीवर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा

आरोपी जयकिशन कांबळे हा एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी होता. त्याच्या विरोधात एका महिलेच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणात अटक झाल्यानंतर कांबळे हा जामिनावर सुटलेला आहे. बलात्काराचा गुन्हा नोंदविताच संबंधित पक्षाने हकालपट्टी करणारे पत्रही काढले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद