शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

सेल्फीच्या नादात अजिंठा लेणीच्या कुंडात पडला पर्यटक; पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 17:21 IST

हा कुंड सुमारे दोन हजार फूट खोल आहे. सुदैवाने पर्यटक एखाद्या खडकावर पडला नाही.

श्यामकुमार पुरेसिल्लोड: अजिंठा लेणीच्या समोरील (व्ह्यू पॉईंट) धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात एक पर्यटक थेट पाय घसरून दोन हजार फूट खोल कुंडात पडला. बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन त्या तरुणाला बाहेर काढले. पोलीस व  पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे त्या तरुणाचे प्राण वाचवले.  ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली.

कुंडात पडलेल्या पर्यटकांचे नाव गोपाल पुंडलिक चव्हाण(वय ३० वर्ष रा.नांदातांडा ता. सोयगाव) असे आहे. हा पर्यटक त्याच्या जळगाव जिल्ह्यातील चार मित्रासह लेणी बघायला आला होता. सकाळी अजिंठा लेणी बघून झाल्यावर तो सेल्फी काढण्यासाठी  मित्रासोबत सप्त कुंड असलेल्या अजिंठा लेणीच्या धबधब्याच्या वर गेला. यावेळी सेल्फी काढण्याचा प्रयत्नात तो दोन हजार फूट खोल असलेल्या सप्त कुंडात पडला.

त्याला पोहता येत असल्याने त्याने कसे तरी कुंडाच्या एका कापरीचा सहारा घेतला व दगडाला पकडून आपला जीव वाचवला. माहिती मिळाल्यानंतर कुंडात पडलेल्या पर्यटकाला वाचवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोलीस कर्मचारी योगेश कोळी, विनोद कोळी निलेश लोखंडे व भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी भरत काकडे, मुकेश पुरे, संतोष दामोधर, सलीम शहा,शेख रईस, सुभाष दामोधर,सईद कादरी,शेख मुनाफ,शरीफ शहा,मनोज दामोधर, सुरक्षा गार्ड:- समाधान आगे,दिलीप देसाई,संदीप सपकाळ, अमोल बलांडे यांनी त्याला रेस्क्यू ऑपरेशन करून दोरीच्या साह्याने  वर काढले. 

सेल्फीचा मोह आवरेना...गेल्या आठ दिवसांपासून अजिंठा लेणी परिसरात झालेल्या पावसामुळे लेणीचा धबधबा ओसंडून वाहत आहे. यामुळे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधब्याजवळ जात आहे. हा धबधबा जवळपास दोन हजार फूट उंचावरून कोसळतो, यामुळे व्ह्यू पॉईंट जवळून पर्यटक थेट डोंगरावर जाऊन सेल्फी काढतात. 

सेक्युरिटी गार्ड चे कुणी ऐकत नाही..जेथून धबधबा कोसळतो, तेथे पुरातत्व विभागाने पाईप लावून बेरिकेट केले आहे. तेथे सेक्युरिटी गार्डही आहे, मात्र त्या बेरिकेटमधून घुसून पर्यटक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात यामुळे अशा घटना घडत आहे.

पर्यटकांनी स्वतः ला सांभाळावे..पर्यटकांनी लेणीचा व निसर्गाचा आनंद घ्यावा मात्र स्वतः चा जीव सांभाळावा...ज्यास्त जवळ जाऊन जीव धोक्यात घालू नये.-जे.एन. दिवेकर संवर्धन सहायक अजिंठा लेणी. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळsillod-acसिल्लोडAurangabadऔरंगाबाद