शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणाच्या संशयावरून भयंकर कृत्य; ८५ वर्षीय वृद्धाचा झोपेतच अंगावर ॲसिड खून

By दिपक ढोले  | Updated: September 19, 2023 19:04 IST

या प्रकरणी दोन संशयितांविरुध्द जाफराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी एका वृध्दाच्या अंगावर रात्री झोपेतेच ॲसिड टाकले. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील म्हसरुळ येथे मंगळवारी उघडकीस आली. श्रीरंग हरीबा शेजूळ (८५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुध्द जाफराबाद पोलिस ठाण्यात सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी उत्तम श्रीरंग शेजूळ (३२, रा.म्हसरुळ) यांच्या फिर्यादीवरून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे वडील श्रीरंग हरीबा शेजूळ हे १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात बाजेवर झोपले होते. फिर्यादी उत्तम शेजूळ हे गावातील सांस्कृतिक सभागृहात झोपण्यासाठी गेले. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने उत्तम शेजूळ हे चुलतभावाला सोबत घेऊन घराकडे धावत आले. यावेळी वडिलांच्या संपूर्ण अंगावर कुठलेतरी द्रव टाकलेले दिसले. त्यामुळे अंग भाजत असल्याने ते ओरडत होते. आजूबाजूला पाहिले असता कुणीच दिसून आले नाही. नंतर वडिलांना जाफराबाद ग्रामीण रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले.

दरम्यान, सोमवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गावातील संशयित नंदू किशोर शेजूळ यांनी तीन महिन्यांपूर्वी श्रीरंग शेजूळ यांना धमकी दिली होती. तसेच नंदू भास्कर साबळे यानेही श्रीरंग शेजूळ यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनीच वडिलांच्या अंगावर जिवे मारण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी संशयित नंदू किशोर शेजूळ (३३) याच्या घरातून ॲसिड जप्त केले असून, त्याला अटक केली आहे. तसेच संशयित आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना