शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

By बापू सोळुंके | Updated: June 19, 2025 19:41 IST

मंत्री शिरसाट यांनी जलील यांच्याविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: एमआयडीसीतील ट्रक टर्मिनल्ससाठी आरक्षित भूखंड मंत्री संजय शिरसाट यांनी पदाचा गैरवापर करून त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या नावे घेतल्याचा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपामुळे आपली जनमाणसांत प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करीत मंत्री शिरसाट यांनी जलील यांच्याविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्यावर २४ जून रोजी सुनावणी होणार असल्याचे त्यांचे वकील ॲड.राजेश काळे यांनी सांगितले.

मंत्री शिरसाट यांनी दाखल केलेल्या खटल्यात नमूद केले की, ते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सक्रिय पदाधिकारी आहेत. दोनवेळा नगरसेवक, चौथ्यांदा आमदार पदी निवडून आले आहेत. माजी खा. सय्यद इम्तियाज जलील यांनी ५ जून रोजी पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी मद्य कारखान्यासाठी पुत्र सिद्धांत यांच्या नावे शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड घेतला. सत्तेचा गैरवापर करीत आरक्षण बदलून त्यांना हा भूखंड घेतल्याचा आरोप केला. याबाबतच्या बातम्या समाज माध्यम आणि दुसऱ्या दिवशी विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या. वास्तविक या भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात आपण कोणताही पत्रव्यवहार केला नाही. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांना फोन कॉलही केलेही नाही.  जलील यांच्या आरोपामुळे आपली प्रतिमा जनमाणसांत मलिन झाली. यामुळे व्यथित झाल्याचे नमूद केले. 

त्यांनी ॲड. राजेश रतनलाल काळे यांच्यामार्फत जलील यांच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक ३ यांच्या न्यायालयात भारतीय न्याय संहिता कलम ३५६(१),(२),(३) आणि जूना अब्रूनुकसानीचा कायदा कलम ५०० नुसार  फौजदारी खटला दाखल केला. हा खटला आज १९ जून रोजी सुनावणीसाठी आला होता. मात्र नियमित न्यायाधीश सुटीवर असल्याने या खटल्याची पुढील सुनावणी २४ जून रोजी ठेवण्यात आली आहे. 

२ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूदशिरसाट यांनी माजी खा. सय्यद इम्तियाज जलील यांच्याविरोधात ज्या कलमानुसार खटला भरला आहे. यात जर जलील हे दोषी ठरले तर त्यांना २ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच या खटल्यात त्यांनी नुकसानभरपाई मागितली नाही.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटImtiaz Jalilइम्तियाज जलीलCourtन्यायालयchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर