शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद मुक्काम रद्द, थेट दिल्लीला जाणार; रविवारी पुन्हा येणार

By बापू सोळुंके | Updated: July 30, 2022 18:58 IST

CM Eknath Shinde ;: वैजापूर तालुक्यातील महालगाव येथिल सभा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने थेट औरंगाबाद विमानतळावर येतील.

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचा अचानक दिल्ली दौरा ठरलाय. यामुळे ते आज रात्री औरंगाबाद येथे नियोजित मुक्कामी नसतील. रात्री ते औरंगाबादहून दिल्लीला रवाना होतील. उद्या सकाळी परत औरंगाबादला येऊन नियोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील. 

नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि. ३० व ३१ जुलै रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पूर्ण दोन दिवसांत ते पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी व विकासकामांचा विभागीय आढावा घेणार आहेत. मात्र, सायंकाळी अचानक त्यांच्या दौऱ्यात बदल झाला असून वैजापूर तालुक्यातील महालगाव येथिल सभा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने थेट औरंगाबाद विमानतळावर येतील. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होणार आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक ठरला असल्याची चर्चा आहे.

असा असेल रविवारचा नियोजित कार्यक्रम रविवारी ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी व विकासकामांचा विभागीय आयुक्त कार्यालयात ते आढावा घेतील. दुपारी १२.३० वाजता सिल्लोडकडे रवाना होतील. १.३० वाजता सिल्लोडमधील बाळासाहेब ठाकरे उद्यान लोकार्पण सोहळा, दुपारी २.३० वाजता आ. अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी भेट दिल्यावर नगरपालिका इमारतीचे भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण, प्रवेशद्वाराचे लोकार्पण, नॅशनल सहकारी सूतगिरणी भूमिपूजन मुख्यमंत्री करतील. त्यानंतर नगर परिषद मैदानावर दुपारी २.४५ वाजता जाहीर सभेला ते संबोधित करतील. सायंकाळी ४.१५ वाजता ते सिल्लोड येथून औरंगाबादला येतील. हर्सूल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते ७.१५ वाजता टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास व भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर आ. प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयाला भेट देतील. पुढे ८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गुरुद्वारास भेट देतील. त्यानंतर ते आ. संजय शिरसाट यांच्या कार्यालयाकडे रवाना होतील. ९.१५ वाजता आ. संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाकडे मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल. रात्री ९.४५ वाजता आ. अतुल सावे यांच्या ज्योतीनगर न्यू एसबीएच कॉलनी येथील निवासस्थानी भेट देऊन ते रात्री ११ वाजता शासकीय विमानाने मुंबईला रवाना होतील.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादdelhiदिल्ली