शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

एका शिवमंदिराला चक्क ‘रावणा’चे नाव! ‘रावणेश्वर’ची आख्यायिका काय? कोणत्या गावात आहे?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 28, 2025 18:56 IST

श्रावणी सोमवार विशेष : पुरातन शिवमंदिर ‘रावणेश्वर’ची आख्यायिका काय?

छत्रपती संभाजीनगर : लंकाधिपती ‘रावण’ हा केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हता, तर तो भगवान शंकराचा अतिशय निष्ठावान भक्त होता, याचा आपल्याला रामायणात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो; पण तुमचे लक्ष वेधून घेईल अशी खास गोष्ट म्हणजे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेले एक पुरातन शिवमंदिर, जे ‘रावणेश्वर’ या नावाने ओळखले जाते.

मंदिर कुठे आहे?वैजापूर तालुक्यातील देवगाव-रंगारी मार्गावर ‘शिवूर’ या गावात हे रावणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. शहरापासून अवघ्या ५७ किलोमीटरवर हे गाव आहे.

आख्यायिका काय सांगते?रामायण काळात शिवूर हे जंगलाने वेढलेले ठिकाण होते. येथे रावणाने शिव वरदानासाठी कठोर तपस्या केली. मात्र, भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा रावणाने आपली नऊ मुंडकी अर्पण केली. दहावे मुंडके कापण्याच्या तयारीत असतानाच शंकर प्रकट झाले. त्यावेळी रावणाने भगवान शंकराला विनंती केली की, “तुमचं हे रूप माझ्या नावानं ओळखलं जावं.” भगवान शंकरांनी तथास्तू म्हटले. त्यावेळी या जागेवर शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तब्बल ८८ हजार ऋषी बोलावले गेले. मात्र, कोणीही मंत्र म्हणण्यास तयार नव्हते. अखेर खुद्द ब्रह्मदेवांनी मंत्रोच्चार केले आणि येथे शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा झाली. आजही ही शिवपिंड ‘रावणेश्वर’ म्हणून पुजली जाते. संत बहिणाबाईंच्या अभंगातही याचा उल्लेख सापडतो.-बाळासाहेब मुळे, पुजारी

नागरशैलीतील वास्तुशिल्प१) मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असून उंच कळस लक्षवेधक आहे.२) मंदिरावरील कोरीवशिल्पे पाहता पाहता डोळ्यांचे पारणे फिटते.३) पूर्वाभिमुख गर्भगृह हे संपूर्ण बंदिस्त आहे. शिवपिंडीचा आकार मोठा आहे.४) प्रवेशद्वारात गणेश व कालभैरवाच्या मूर्ती आहेत. चौकटीवर दरबारात विराजमान शंकर-पार्वतीचे दृश्य कोरलेले आहे.

‘रावणेश्वर’ नावाची अन्य मंदिरे कुठे आहेत?१) शिवूर, छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)२) रावणगाव, पुणे-दौंड मार्गावर (महाराष्ट्र)३) कोल्हापूर (महाराष्ट्र)४) रावणेश्वर मंदिर, बैद्यनाथ धाम-देवघर (झारखंड)५) मंडावरग्राम (मध्य प्रदेश)

महाशिवरात्रीला मोठा उत्सवरावणेश्वर मंदिरात महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, नागपंचमी हे सण अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहात साजरे होतात. पंचक्रोशीतील गावांमधून हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.-अशोक गुरव, मंदिराचे गुरव

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShravan Specialश्रावण स्पेशल