शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

एका रिक्षाचालकाचे दोन ते तीन नियम भंग; ‘आरटीओ’चा ७९ जणांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:35 IST

शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. त्याबरोबरच रिक्षाचालकांमधील गुन्हेगारांचे वाढते प्रमाणही चिंतेचा विषय झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : नियमांचे उल्लंघन करीत धावणाऱ्या ७९ रिक्षाचालकांवर आरटीओ कार्यालयाने गेल्या चार दिवसांत कारवाईचा बडगा उगारला. या रिक्षाचालकांकडून २ लाख ७० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. त्याबरोबरच रिक्षाचालकांमधील गुन्हेगारांचे वाढते प्रमाणही चिंतेचा विषय झाला आहे. हत्येपर्यंतचे प्रकार घडत आहेत. शहरातील रिक्षांच्या वाढलेल्या मुजोरीसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वाहतूक पोलिसांबरोबर आरटीओ कार्यालयही रस्त्यावर उतरले. आरटीओ कार्यालयाने १२ जूनपासून सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत आतापर्यंत ७९ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

एका रिक्षाचालकाचे दोन ते तीन नियम भंगतपासणीदरम्यान काही रिक्षाचालक दोन ते तीन नियमांचा भंग करून रस्त्यावर प्रवासी वाहतूक करीत होते. त्यामुळे अशा रिक्षाचालकांवर किमान तीन ते चार प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सर्वाधिक प्रकरणे ‘एक्सपायर्ड डॉक्युमेंट्स’चीतपासणीत एकूण ४८ रिक्षाचालकांकडे कालबाह्य कागदपत्रे आढळली. तर, २५ रिक्षाचालकांकडे वैध परवाना आणि बॅज नव्हता. २१ रिक्षाचालक हे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करताना आढळले. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेस थेट धोका निर्माण होतो.

कोणकोणत्या नियमांचे उल्लंघन?नियमभंगाचा प्रकार - प्रकरणेमुदतबाह्य कागदपत्रे - ४८क्षमतेपेक्षा प्रवासी - २१परवाना नसलेले - ४लायसन्स, बॅज नसलेले - २५गणवेश नसलेले -१९अनधिकृत पार्किंग - ६

कारवाई सुरूच राहीलरिक्षाचालकांची तपासणी मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. १२ जूनपासून सुरू केलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करून २.७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाCrime Newsगुन्हेगारीRto officeआरटीओ ऑफीस