शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

दवाखान्यात पत्नीस भेटण्यास आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले, रिक्षाचालकाचा प्रताप

By राम शिनगारे | Updated: May 24, 2023 21:05 IST

पुंडलिकनगर पोलिसांनी सहा तासात आरोपीस शोधून ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : ऐशी वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक दवाखान्यात उपचार घेत असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी आले होते. दुपारी १२ वाजता पत्नीस भेटून घरी जाण्यासाठी रिक्षात बसले. त्या रिक्षाच्या चालकासह सहप्रवाशाने त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. ही घटना मंगळवारी दुपारी पुंडलिकनगर भागात घडली. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी सहा तासांच्या आत आरोपीस शोधून बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ सूर्यभान सुरासे (८०, रा. बीड बायपास) हे मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर भागातील मेडीआर्ट हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या पत्नीस भेटण्यास आले होते. पत्नीला भेटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांनी एका रिक्षाला हात दाखवला. रिक्षा थांबल्यानंतर त्यांनी शिवाजीनगरला सोडण्यास सांगितले. त्यानुसार सुरासे रिक्षात बसल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर आणखी एक प्रवाशी रिक्षात बसला. त्याने सुरासे यांना बोलत असतानाच त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. वृद्ध असल्यामुळे युवकाचा प्रतिकारही करू शकले नाहीत.

त्याचवेळी दोघांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देत गारखेडा परिसरात रिक्षातून उतरून दिले. त्यानंतर सुरासे यांनी पुंडलिकनगर ठाणे गाठत आपबिती सांगितली. तेव्हा निरीक्षक राजश्री आडे यांनी उपनिरीक्षक संदीप काळे, हवालदार बळीराम चौरे, अजय कांबळे, दीपक जाधव यांना रिक्षाचा शोध घेण्याचे आदेश दिले. सहा तासाच्या आत रिक्षाचालक शेख वसीम अक्रम शेख अब्दुल कादर (४०, रा. चिश्तिया कॉलनी, एन ६, सिडको) यास पोलिसांनी शोधुन बेड्या ठोकल्या. रिक्षाचालकाकडून रोख रक्कम आण रिक्षा असा एकुण १ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती निरीक्षक आडे यांनी दिली.दोन दिवसांची पोलिस कोठडी

पुंडलिकनर पोलिसांनी आरोपीस अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजुर केली आहे. तपास उपनिरीक्षक संदीप काळे करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद