शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शहरानंतर नाव बदलाची मोहीम किल्ल्यापर्यंत; दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा होणार 'देवगिरी'

By सुमेध उघडे | Updated: September 17, 2022 17:08 IST

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद: शहराजवळील ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याची ओळख पुन्हा एकदा देवगिरी किल्ला करण्यात येईल अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहराची नावे बदलाची मोहीम आता किल्ल्याचे नाव बदलापर्यंत आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन मंत्री लोढा यांनी देवगिरी किल्ल्याला गेल्या काही वर्षात दौलताबादचा किल्ला असं नाव पडलं आहे. ते पुन्हा देवगिरी किल्ला करण्याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दिली. तसेच इथून पुढे दरवर्षी १७ सप्टेंबरला दौलताबाद येथील भारत माता मंदिराच्या प्रांगणात पर्यटन विभागाच्यावतीने ध्वजारोहण कार्यक्रम पार पडेल असेही त्यांनी सांगितले. शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठवला आहे. यासोबतच शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा देखील प्रस्ताव आहे. ही नावे बदल्याची मोहीम आता किल्ल्याचे सुरुवातीचे नाव देण्यापर्यंत आली आहे. 

दौलताबाद किल्ल्याचा थोडक्यात इतिहासराष्ट्रकूट राजवंशाचा पाडाव झाल्यानंतर त्यांचा मांडलिक असलेल्या भिल्लम यादव (पाचवा) याने देवगिरीवर स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्या वंशात पुढे सिंघणदेव, कृष्णदेव, महादेव, आमणदेव आणि शेवटी रामचंद्रदेव यादव हे राजे झाले. दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी करून यादवांचा पराभव केला आणि संपत्ती लुटली, सत्ता मिळवली. पुढे मुहम्मद तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती. याच तुघलकाने देवगिरीचे नाव दौलताबाद केले. मात्र, अनेक अडचणी आल्याने तो पुन्हा दिल्ली गेला. त्यानंतर बहामनी, निजामशाही आणि मुघलांची या प्रदेशावर सत्ता राहिली. मलिक अंबर या वजीराने चांदबीबीच्या मृत्यूनंतर मुघलांपासून वाचवून अहमदनगरच्या निजामाला दौलताबादला आणून इथून त्याच्या नावे राज्य चालवले. त्यानंतर त्यांनी खडकीला तळ हलवला. पुढे मुघलांच्या काळात या खडकीचे नाव औरंगाबाद झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDoulatabad Fortदौलताबाद किल्लाtourismपर्यटनMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा