शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

रंग बदलणारा दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा; क्वचितच जमिनीवर उतरतो, दवबिंदू पिऊन भागवतो तहान

By साहेबराव हिवराळे | Updated: August 2, 2023 19:01 IST

अधिवासानुसार रंग बदलणारा शॅमेलिऑन म्हणजे सुद्धा निसर्गातलं एक आश्चर्यच!

छत्रपती संभाजीनगर : अतिशय दुर्मीळ असा समजला जाणारा शॅमेलिऑन हा रंग बदलणारा सरडा सातारा परिसरात दिसून आला. ज्युरासिक पार्कमधील डायनासोरच जणू ही छोटी प्रतिकृतीच भासत होती. या सरड्याला पकडून सातारा वनक्षेत्रात सोडण्यात आले.

हा अतिशय शांत आणि बिनविषारी जीव असून बरेच लोक त्याचा चमेलिओन असाही उच्चार करतात. काही ठिकाणी याला घोयरा सरडा म्हणतात. संपूर्ण भारतभर विविध प्रकारचे सरडे आढळतात. शॅमेलिऑन सरड्याचे खडबडीत दिसणारे शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटे केल्यासारखे दिसते. एकावर एक तीन शिरस्त्राणे घातल्यासारखे दिसणारे डोके, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे हडकुळे पाय, डायनोसारची आठवण करून देणारा जबडा, असे त्याचे स्वरूप असते.

मुंगळे, किडे, फुलपाखरू खाद्यशॅमेलिऑन क्वचितच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदूच पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते व बिळ खोदून त्यात अंडी घालते. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहूल घेत, विचार करून हा सरडा प्रत्येक पाऊल टाकतो. कीटक, मुंगळे, फुलपाखरू हे त्याचे खाद्य. कुशल कसरतपटूप्रमाणे हा लवचीक फांद्यांवरही मस्त हालचाली करतो. तो वेगाने धावणारं भक्ष्य कसं पकडणार असा एक प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतो. पण निसर्गाने त्याच्या प्रत्येक अपत्यासाठी काही ना काही तजवीज करून ठेवलेली असते. अधिवासानुसार रंग बदलणारा शॅमेलिऑन म्हणजे सुद्धा निसर्गातलं एक आश्चर्यच!

जीभ त्याचे एकमेव अस्त्र...त्याची जीभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. शॅमेलिऑनचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसवलेले असतात. या दुर्मिळ प्रजातीचे संरक्षण गरजेचे आहे.-सर्पमित्र दीपक रत्नपारखे

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगल