शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

घटनास्थळ पाहणीसाठी गेलेल्या पोलिसावर चाकू हल्ला

By राम शिनगारे | Updated: May 10, 2023 20:17 IST

जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : छावणी पोलिस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्यात घटनास्थळाची पाहणी करून आरोपीस पाबंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर आरोपीने चाकु हल्ला केला. ही घटना ९ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास छवणीतील गवळीपुऱ्यात घडली. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.

रोहन नारायण येरले (रा. गवळीपुरा, छावणी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पोलिस कर्मचारी केशव काळे हे अदखलपात्र गुन्ह्यातील घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी ठाण्यात नोंद करून गेले होते. अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपी राेहन येरले यास पाबंद घालण्यासाठी काळे हे १. ४५ वाजता घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी तक्रारदार राजु मित्रे व त्यांच्या पत्नीकडे पोलिस कर्मचारी काळे हे चौकशी करीत असतानाच त्यांचा जावाई आरोपी रोहन येरले हा शिवीगाळ करीतच आला. त्यास काळे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने आमचे फॅमिली मॅटर आहे. तुम्ही मध्ये येऊ नका असे बाेलुन त्याने उजव्या पायाच्या पोटरीला लावलेला चाकु काढुन काळे यांच्यावर हल्ला केला. काळे यांनी चतुराई दाखवत येरले यास पकडत,पोलिस निरीक्षक देशमाने यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ पीटर मोबाईलचे चार पोलिस कर्मचारी घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत आरोपीस काळे यांनी पकडून ठेवले होते. तोपर्यंत तो पोलिसांना शिविगाळ करीतच होता. पोलिसांनी पकडून त्यास पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी त्यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक कैलास देशमाने करीत आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी पोलिसावर हल्लाहर्सूल कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात असलेल्या तीन आरोपींनी घरचे जेवण, तंबाखूसह इतर साहित्यासाठी न्यायालयाच्या आवारातच पोलिसांवर हल्ला केल्याची घटना ८ मे रोजी घडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी छावणीत पोलिस कर्मचाऱ्यावर आरोपीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद