शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हर्सूल जेलमधील पोलिस अंमलदाराची डोके, चेहरा ठेचून हत्या; जेल परिसरातच आढळला मृतदेह

By सुमित डोळे | Updated: April 22, 2024 13:12 IST

घटनास्थळी दारूच्या बाटल्या व दोघांचे बूट व मोठ्या प्रमाणात रक्त आढळून आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हत्यांचे सत्र अद्याप सुरू असून सोमवारी पहाटे पुन्हा एक हत्या झाल्याची घटना निदर्शनास आली. हर्सूल कारागृहाचे अंमलदार सिद्धार्थ बन्सीलाल जाधव ( ४२, रा. जेल कर्मचारी निवासस्थान)  यांची कारागृह परिसरातच लाकडी दांड्याने चेहरा व डोके ठेचून हत्या करण्यात आली. यात सचिन भगवान दाभाडे (३६, रा. चेतना नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

हर्सूल पोलिसांच्या माहितीनुसार, ४५ वर्षीय जाधव हे हर्सूल कारागृहात अंमलदार होते. पत्नी, मुलगी, मुलासह ते कारागृह कर्मचारी निवासस्थानात वास्तव्यास होते. सोमवारी पहाटे निवासस्थानाच्या आवारात पडक्या जागेत जाधव अत्यंत गंभीर अवस्थेत आढळल्याचा कॉल हर्सूल पोलिसांना प्राप्त झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा डोक्याच्या मागील बाजू व तोंडावर गंभीर वार झाल्याचे आढळून आले. घटनास्थळी दारूच्या बाटल्या व दोघांचे बूट व मोठ्या प्रमाणात रक्त आढळून आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जाधव व दाभाडे दोघे मित्र आहेत. रविवारी रात्री ते कारागृह परिसरात भेटले. त्यानंतर जाधव यांची हत्या झाली तर गंभीर जखमी दाभाडे यांनी जखमी अवस्थेतच मित्राच्या घरी धाव घेतली. मित्राच्या दरवाजावरच ते कोसळून बेशुद्ध झाले. मित्राने त्याला घाटीत दाखल केले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. जाधव यांची हत्या कोणी केली, हे अद्याप ही गूढ असून दाभाडे शुद्धीवर आल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल. दरम्यान, पोलिस तांत्रिक तपासाच्या आधारे देखील मारेकऱ्यांचा शोध  घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद