शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

corona virus: आरोग्य यंत्रणेपुढे नवी चिंता; कोरोना उतरलाय आता गळ्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 11:54 IST

‘पाॅझिटिव्ह’पेक्षा निगेटिव्ह, पण कोविड, स्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचीच संख्या सर्वाधिक

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोना आणि स्वाइन फ्लू पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत असेल, असा अनेकांचा समज होईल. पण टेस्टमध्ये कोरोना आणि स्वाइन फ्लू सापडतच नाही आणि रुग्णाला गंभीर लक्षणे दिसतात, अशा नव्या चिंतेला सामोरे जावे लागत आहे. कोरोना आता गळ्याखाली उतरला आहे. त्यामुळेच चाचण्या निगेटिव्ह येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोविड, स्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचीच संख्या सध्या सर्वाधिक आहे. त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून ‘आता काही टेन्शन नाही...’ असे म्हणणे कदाचित धोकादायक ठरू शकते.

जिल्ह्यात जूनपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. मात्र, अवघ्या दोन महिन्यांत रुग्णसंख्येचा आलेख घसरला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून दिलासा व्यक्त होत नाही तोच स्वाइन फ्लूने डोके वर काढले. जिल्ह्यात आतापर्यंत ३७ स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे निदान झाले. कोरोना, स्वाइन फ्लू दोन्ही आजारांच्या रुग्णांचे निदान होत आहे. रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु या दोन्ही आजारांची लक्षणे आहेत. प्रकृती गंभीर होऊन रुग्णालयात भरती होण्याची वेळ येत असूनही रुग्णांचा अहवाल नकारात्मक येत असल्याचा प्रकार आरोग्य यंत्रणेसाठी चिंतादायक ठरत आहे.

किती आहेत कोविड, स्वाइन फ्लूसदृश्य रुग्ण?घाटी रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात तब्बल १२२ कोविड, स्वाइन फ्लू रुग्णांवर उपचार करण्यता आले. रुग्णांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असूनही भरती होण्याची वेळ रुग्णांवर ओढवली. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक आहे.

सर्दी, खोकल्याचा कालावधी लांबलासर्दी, खोकला साधारणपणे ३ ते ५ दिवसांत बरा होताे. परंतु सध्या ८ ते १५ दिवस या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शहरातील कोरोनाची स्थितीतारीख-कोरोना टेस्ट- पाॅझिटिव्ह रुग्ण३१ ऑगस्ट-१६७-२१ सप्टेंबर-१५१-३२ सप्टेंबर-२०७-४३ सप्टेंबर-९८-५

काळजी घेणे गरजेचेस्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी आहे. तरी सामान्य सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. स्वाइन फ्लू न्यूमोनिया, कोविड न्यूमोनिया आणि कम्युनिटी ॲक्वाएर्ड न्यूमोनिया असे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण दाखल होत आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी.- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद