शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साखर, तेलाविनाच वाटाला ‘आनंदाचा शिधा’; अर्धवट पुरवठ्यामुळे प्रशासनाची तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:15 IST

दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत.

औरंगाबाद : राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून रवा, साखर, हरभरा डाळ आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला, पण या उपक्रमात किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी साखर, तेल यांच्याशिवायच हा शिधा वाटप करावा लागला. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांपर्यंत किट वाटप करताना पुरवठा विभागाची प्रचंड दमछाक झाली.

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला. प्रशासनाने तीन वस्तू असलेले किट प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये वाटप केल्या. अनेक ठिकाणी तेल, साखरेविनाच शिधा वाटप झाले.

जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ५०२ रेशन कार्डधारक आहेत. त्यापैकी ५ लाख ५८ हजार कार्डधारक रेशन धान्यास पात्र आहेत. या सर्व कार्डधारकांना शासनाच्या घोषणेनुसार यंदा दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार होता. शासनाने दिवाळी किट उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटदारही नियुक्त केला. जिल्हा पुरवठा विभागाने कंत्राटदाराकडे दुसऱ्याच दिवशी फूड पॅकेटची मागणी नोंदविली होती, परंतु दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुरवठा विभागासह रेशन दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागली.

५०१ दुकानांवर दिल्या तीन वस्तूजिल्ह्यात १८०१ रेशन दुकानांपैकी अंदाजे १३०० दुकानांवर दिवाळीचे फूड किट शंभर टक्के पुरवठा करण्यात प्रशासनाला यश आले. ३० टक्के रेशन दुकानांवर केवळ चारऐवजी तीन वस्तू उपलब्ध झाल्या. त्यामुळे ५०१ दुकानांशी संलग्न असलेल्या कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातील पूर्ण किट दिवाळसणात मिळाले नाही.

जे उपलब्ध झाले ते दिलेअखेर जिल्हा पुरवठा विभागाने ज्या ठिकाणी तीन पॅकेट उपलब्ध आहेत, त्या दुकानदारांनी शंभरऐवजी ७५ रुपये घेऊन ते कार्डधारकांना वितरीत करावेत, असा निर्णय घेतला. तीन फुड पॅकेट का देताय, उर्वरित पॅकेट कुठे आहेत, असा सवाल उपस्थितीत करीत ग्राहकांनी दुकानदारांसोबत वाद घातल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDiwaliदिवाळी 2022