शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय

By विजय सरवदे | Updated: March 27, 2023 15:47 IST

चार वर्षांपूर्वी डॉ. रावजी शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने आपल्या अथक बुद्धीच्या बळावर देशातील पहिली इंधन विरहित रेल्वे तयार केली. ही रेल्वे चुंबकीय बलावर ताशी ६०० किमी वेगाने धावू शकते, शिवाय ती बुलेट ट्रेनलाही पर्याय ठरेल. पुढील महिन्यात चेन्नई येथील आयआयटीमध्ये या रेल्वेच्या मॉडेलचे परीक्षण केले जाणार आहे. थोर शास्त्रज्ञ डॉ. रावजी शिंदे यांनी तयार केलेली ही रेल्वे भविष्यात परिवहन क्षेत्रामध्ये क्रांती करणारी ठरेल.

संगमनेर तालुक्यातील मनोलीचे रहिवासी डॉ. रावजी शिंदे यांनी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या टीममध्ये आठ वर्षे काम केले. ते नुकतेच ‘एमजीएम’मध्ये एका राष्ट्रीय चर्चासत्रासाठी आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ला त्यांनी या चुंबकीय रेल्वेच्या (मॅग्लेव्ह) संशोधनाचा इतिहास तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत संरक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती कथन केला.

डॉ. शिंदे हे कानपूर येथील आयआयटीचे सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी स्वदेशी चुंबकीय तंत्रज्ञान विकसित केले असून भारत सरकारने त्यांना ‘उत्कृष्ट वैज्ञानिक’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. असे असले तरी त्यांचे लहानपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानतर ‘गेट’ परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे त्यांना ठाऊकही नव्हते. त्यावेळी ते आईला मदत म्हणून खदानीत दगड फोडण्याचे काम करायचे. कानपूर येथे आयआयटीची पदवी घेतल्यानंतर ते डॉ. शिंदे सांगतात, जपानमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलो. तेथेच पीएच.डी.ची पदवी संपादन केली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम कार्यक्रमासाठी जपानला आले आणि भारतीय विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तेव्हा भारतात आयआयटी करून आपले विद्यार्थी पदवीचा उपयोग विदेशासाठी करतात. देशाला तुमची गरज आहे. तुम्ही परत चला, अशी त्यांनी साद दिली आणि मी त्यांच्यासोबत भारतात परत आलो. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’त त्यांच्या टीममध्ये बरेच वर्षे काम केले.

भारत तिसरा देश ठरेलअलीकडे चार वर्षांपूर्वी डॉ. शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. ही रेल्वे चालविण्यासाठी द्रवरूप नायट्रोजन चुंबकीय शक्तीच्या रुळांचा वापर केला जातो. रेल्वेच्या प्रारूपाची प्रात्यक्षिके यशस्वी झाल्यानंतर त्यासंबंधी भारत सरकारसोबत चर्चा झाली. मात्र, कोरोना काळात दोन वर्षे गेली. आता चेन्नई येथील आयआयटीतील रेल्वे विभागाने या रेल्वेच्या परीक्षणासाठी निमंत्रण दिले आहे. ही रेल्वे प्रत्यक्षात उतरल्यास चुंबकीय रेल्वेसाठी जपान आणि चीननंतर भारत देश जगात तिसरा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद