शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

धनगरपट्टी शिवारात बिबट्याने बकऱ्याचा फडशा पाडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:41 IST

मागील आठवड्यापासून दररोज परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. 

कायगाव : अगरवाडगाव परिसरातील धनगरपट्टी शिवारात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता बिबट्याने दोन बकऱ्यांचा फडशा पाडला. गेल्या काही दिवसांपासून अगरवाडगाव, भिवधानोरा, धनगरपट्टी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दररोज बिबट्या शेतकऱ्यांना दर्शन देत असून शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.

धनगरपट्टी येथील दिलीप सुखधान यांच्या शेतवस्तीवर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता बिबट्या आला. दिलीप सुखधान यांच्या डोळ्यासमोर त्याने दोन बकऱ्यावर हल्ला केला. क्षणात त्याने दोन्ही बकऱ्यांचा फडशा पाडला, आणि त्या वस्तीवरून पळ काढला. मागील आठवड्यापासून दररोज परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. 

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. यापूर्वीच्या घटना लक्षात घेता या भागात बिबट्याचा सदैव वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. शनिवारी रात्री अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला जवळून पाहिले. काही शेतकऱ्यांनी त्याचे मोबाईलवर व्हिडीओ काढले. सकाळी वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुढाकार घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादleopardबिबट्या