शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दहशत पसरविण्यासाठी जामिनावरील गुंडाची खुलेआम तलवारबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 13:40 IST

आठ दिवसांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या आरोपीची तलवारीने दहशत

औरंगाबाद : आठ दिवसांपूर्वी खुनाच्या घटनेतील आरोपी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याने चंपा चौकात तलवार घेऊन व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवली. एका रिक्षासह चारचाकी गाडीच्या काचा फोडल्याची घटना चंपा चौकात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच जिन्सी, सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

छावणीतील हॉटेल, बांधकाम व्यावसायिकाच्या २८ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या निर्घृण खून प्रकरणात शेख अश्पाक शेख इसाक उर्फ अश्पाक पटेल (रा़ शहाबाजार) हा आरोपी आहे. हा खटला न्यायप्रविष्ट असून अश्पाक पटेल हा हर्सूल कारागृहामध्ये कैद होता़ आठ दिवसांपूर्वीच अश्पाक जामिनावर सुटला होता. अश्पाक गुरुवारी दहा वाजेच्या सुमारास चंपा चौकात आला़ तो तलवार फिरवत शिवीगाळ करत होता़ रस्त्याने येणारे-जाणारे नागरिक भयभीत झाले होते़ चौकातील दुकाने बंद झाली होती़ नागरिक अश्पाकपासून दूर पळत होते़ रस्त्याने जाणारी एक कार आणि रिक्षावर त्याने हल्ला करून त्यांच्या काचा फोडल्या़ हा प्रकार पोलिसांना कळताच सिटी चौक आणि जिन्सी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर आणि सिटी चौकचे सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन सय्यद यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच अश्पाक पसार झाला़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. अफवा पसरल्यामुळे पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, अशोक थोरात, वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी, निरीक्षक विनोद सलगरकर, निरीक्षक राजेश मयेकर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती तत्काळ पूर्ववत केली.

शहर पोलीस गुंडगिरी खपवून घेणार नाहीत : आयुक्तचंपा चौकातील घटनेच्या प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा नोंदविण्यात येईल. आरोपीस लवकरच अटक केली जाईल. तसेच कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर शहर पोलीस हे खपवून घेणार नाहीत. त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी