शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

मद्यधुंद मुलगा संस्कार विसरला; हात उचलताच वडिलांनी फावड्याने डोक्याचा भुगा केला

By सुमित डोळे | Updated: September 23, 2023 16:04 IST

पोलिसी खाक्या दाखवताच हत्येची कबुली

छत्रपती संभाजीनगर : रोज शिवीगाळ करून छळ करणाऱ्या आकाश राजू ऊफाड (२५, रा. पडेगाव) याने गुरुवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत वडिलांना मारहाण केली. रोजच्या या त्रासाला कंटाळून संतप्त वडील राजू शेणफड उफाड (५२) याने मुलगा झोपताच फावड्याने डोके फोडून त्याची हत्या केली. यासंदर्भात घरमालकाने पोलिसांना कळविले. त्यानंतर ठाण्यात दहा तास नामानिराळे राहणाऱ्या बापाला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.

मजुरी काम करणारा राजू, पत्नी सविता, म़ृत मुलगा आकाश हे पडेगाव येथे राहात होते, तर मोठा मुलगा सागर हा पद्मपुऱ्यात राहतो. सागर लालबागच्या दर्शनासाठी मुंबईला आणि पत्नी लक्ष्मी सणासाठी पुण्याला मुलीकडे गेली होती. त्यामुळे आकाश व राजू हे दोघेच घरी होते. २१ सप्टेंबरला आकाश घरी गेल्यानंतर त्यांनी सोबत जेवण केले. मात्र, रोजच्याप्रमाणे पुन्हा त्याने वडिलांसाेबत वाद घातला. रोज पत्नी असल्याने वाद मिटत होता. पण, गुरुवारी वाद वाढतच गेला. आकाशने शिवीगाळ करत वडिलांना बेदम मारहाण केली व झोपी गेला. मुलाच्या या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या संतप्त वडिलाने गाढ झोपलेल्या मुलाचे डोके फावड्याने अक्षरक्ष: फोडून त्याची हत्या केली.

नामनिराळे राहण्याचा प्रयत्नघटनेनंतर राजूने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. मुलाची अज्ञाताने हत्या केल्याचे घरमालकाला सांगितले होते. छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने, सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले, उपनिरीक्षक प्रमोद देवकते, गणेश केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाशच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. शवविच्छेदन होईपर्यंत पोलिसांनी राजूची चौकशी केली नव्हती. झोपेतून पहाटे साडेतीन वाजता लघुशंकेसाठी उठल्यानंतर मुलगा थेट अर्धनग्न अवस्थेत रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्याचे राजू सांगत होता. चार वाजता मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व कबुली दिली. रोज मला शिवीगाळ करायचा. गेल्या काही दिवसांत सतत गळा दाबून श्वास बंद करायचा. गुरुवारी पत्नी घरात नसल्याने संताप अनावर झाला आणि मुलाला मारून टाकल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद