शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​कारसमोर लघुशंकेवरून वाद पेटला, तरुणावर थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले!

By सुमित डोळे | Updated: September 22, 2025 16:56 IST

रविवारी मध्यरात्री १.३० वाजता बारबाहेर घडला प्रकार, पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना

छत्रपती संभाजीनगर : बारमध्ये दारु पिऊन बाहेर आल्यानंतर कारसमोर एकाने लघुशंका करण्यावरुन ग्राहकांच्या दोन गटात वाद पेटले. मात्र, हे वाद टोकाला जात कारचालकाचा दुचाकीवर पाठलाग करत थेट गोळी झाडून हत्येया प्रयत्न करण्यात आला. रविवारी मध्यरात्री १.३० वाजता चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

जमिन व्यावसायिक तौफिक शौफिक पठाण् (३०, रा. कमळापुर) हे २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मित्र निसार जबार सोबत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील पाम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. रात्री १२.३० वाजता जेवण करुन ते बाहेर पडले. यावेळी पार्किंगध्ये गणेश औताडे नामक तरुण दारु पिऊन बाहेर आला. त्याने तौफिक यांच्या कारसमोर लघुशंका केली. यातून त्यांच्यात वाद झाले. शिविगाळ आरडाओरड होत धक्काबुक्की झाली. मात्र, इतरांनी मद्यस्थी करत प्रकरण मिटवले. साधारण १ वाजता तौफिक मित्रासह निघाले. कारने ते कलाग्राम मार्गे प्रोझोन मॉलच्या दिशेने जात असताना निसार यांनी लघुशंकेसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर कार थांबवली. तेवढ्यात एपीआय कॉर्नरच्या दिशेने त्रिपलसीट मोपेडस्वार आले. दुरवर गाडी थांबवत त्यातील एकाने पळत जात पिस्तूल काढून थेट तौफिक यंाच्या दिशेने गौळी झाडली. तेवढ्यात ते मागे सरकले. मात्र, निसार यांच्या कानाजवळून गोळी जात दरवाजाच्या बंद काचेवर लागली. 

पहिले वाळूज पोलिस ठाण्यात गेलेया घटनेमुळे घाबरलेले पहिले त्यांच्या परिसरात जात एमआयडीसी वाळूज पाेलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांना हद्द सांगून एमआयडीसी सिडको पाेलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. परत येईपर्यंत निसार यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, एमआयडी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी