शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आमदार नीलेश राणेंवर गुन्हा दाखल, तरीही शिंदे अनभिज्ञ की सूचक मौन; म्हणाले, 'माहिती घेतो'

By बापू सोळुंके | Updated: November 29, 2025 14:50 IST

तिजोरी ही राज्यातील जनता जनार्दनाची आहे. आम्ही विश्वस्त आहोत- एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर: शिंदेसेनेचे कोकणातील आमदार डाॅ. नीलेश राणे यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल होऊन दहा तासांहून अधिक कालावधी उलटला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी आज शनिवारी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी माहिती घेतो,असे उत्तर देऊन अधिक बोलण्याचे टाळले.

नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी अमरावतीकडे रवाना होण्यासाठी शिंदे शुक्रवारी रात्री छत्रपती संभाजीनगरात मुक्कामी होते. शनिवारी सकाळी अवघ्या एक मिनिट सहा सेकंदात शिंदे यांनी पत्रकारांच्या तीन प्रश्नांची उत्तरे दिले आणि ते प्रचार दौऱ्याला रवाना झाले. नाशिक येथे झाडे तोडण्यासाठी प्रचंड विरोध होतो आहे तेथे अभिनेते सयाजी शिंदे आले आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, याविषयी माहिती घेतो, पर्यावरण पुरकच आम्ही प्रकल्प करीत असतो. पर्यावरणाचा समतोल राखणे ही शासनाची भूमिका आहे, हे अनेक प्रकल्पामधून आपण पाहिले आहे. याबाबत अधिक माहिती घेतो.

आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, याविषयी विचारले असता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याविषयी माहिती घेतो, असे उत्तर देत अधिक बोलण्याचे टाळले. उपमुख्यमंत्री अजीत पवार हे प्रचारादरम्यान निधी देणार नाही, असा इशारा मतदारांना देतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पवार यांच्यावर टीका करताना निधी का त्यांच्या बापाचा आहे का, असा सवाल केला. याविषयी विचारले असता शिंदे म्हणाले की, खरे म्हणजे हा निधी, राज्याची तिजोरी ही राज्यातील जनता जनार्दनाची आहे. आम्ही विश्वस्त आहोत. यामुळे कोणीही तसा मतिथत्तार्थ काढू नये,असे आपले म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : FIR against MLA Nilesh Rane; Shinde silent, says 'will inquire'.

Web Summary : Despite an FIR against MLA Nilesh Rane, CM Shinde remained non-committal. When questioned, Shinde stated he would gather information. He also addressed environmental concerns regarding tree cutting and funding allegations during campaigns.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEknath Shindeएकनाथ शिंदे