शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी

By सुमित डोळे | Updated: August 8, 2024 11:37 IST

काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता.

छत्रपती संभाजीनगर : ‘आक्षेपार्ह इशारे’, ‘स्पर्श करून पैशांची मागणी’ करणाऱ्या सहा तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर बुधवारी (दि.७) मुख्य चौक तृतीयपंथीयांपासून मुक्त झाले. यामुळे नागरिकांनी देखील पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त करत त्यात सातत्य ठेवण्याची मागणी केली. दरम्यान शाहनूरमियाँ दर्गा चौकात मात्र त्यांचा त्रास देणे सुरूच होता. बुधवारी सकाळी ११:३० वाजता शाहनूरमियाँ दर्गा चौकात पाहणी केली असता एक तृतीयपंथी उस्मानपुरा ते सूतगिरणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील सिग्नलवर पैसे मागताना दिसून आले. काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता.

पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांच्याकडे तृतीयपंथीयांच्या वाढत्या त्रासाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर सेव्हन हिल व सिडको चौकातील उड्डानपुलाखाली वाहनचालकांना पैसे मागणाऱ्या संगीता शेख निकिता (२३, रा. काबरानगर), अमृता जाधव निकिता (३८, रा. बाळापूर), सोफिया शेख आलिया शेख (२५), काव्या शेख आलिया शेख (२५, रा. शिवाजीनगर), कली ऊर्फ कविता रामा शिंदे (३०, रा. मुकुंदवाडी) व छाया वर्मा ऊर्फ संजू तांबू वर्मा (४५, रा. बायजीपुरा) यांना ताब्यात घेत दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या पैसे मागणे व आक्षेपार्ह हरकतींमुळे त्रस्त शहरवासीयांनी पोलिसांच्या या कारवाईनंतर समाधान व्यक्त केले.

या चौकातून गायबबुधवारी कारवाईचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. सिडको, सेव्हन हिल उड्डानपुलाखालील चारही सिग्नलवरून तृतीयपंथीयांसह अन्य भिक्षेकरी गायब झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसभर एकही तृतीयपंथी, अन्य भिक्षेकरी, अल्पवयीन मुले पैसे मागण्यासाठी चौकात आले नसल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.

बीड बायपासवर कारवाई गरजेचीशहरातून हद्दपार करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांकडून रात्री बीड बायपासवर मात्र मोठी गर्दी केली जाते. यातील काहींकडून आक्षेपार्ह कृत्यही केले जाते. देवळाई चौक ते झाल्टा फाट्यापर्यंत ठरावीक अंतरावर अंधारात हे कृत्य चालतात. यावरही ठोस कारवाईची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद