शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी १५ मिनिटात १७ लाख रुपयांची गाडी पळवली; आत होती ५ लाखांची रोकड

By राम शिनगारे | Updated: January 2, 2023 19:55 IST

चावीने कारचे दरवाजे उघडून चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्टपणे दिसत आहे.

औरंगाबाद : एपीआय कॉर्नर येथील रस्त्यवार १७ लाख रुपयांची महागडी गाडी पार्क करून एकजण हॉटेलमध्ये गेला. १५ मिनिटांनी बाहेर आल्यानंतर लावलेल्या जाग्यावर गाडी दिसून आली नाही. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, तोंडाला बांधलेल्या दोन जणांनी गाडी पळवून नेल्याचे दिसून आले. या गाडीत रोख ५ लाख रुपये सुद्धा होते. ही घटना २२ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात १ जानेवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.

श्रीकांत निवृत्ती हिवराळे (रा. ब्रिजवाडी, चिकलठाणा) हे व्यापारी आहेत. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार २०२१ मध्ये महिंद्रा कंपनीची कार (एमएच २० एफयू ७४५२) फायनान्सचे कर्ज मंजुर होत नसल्यामुळे शेख फिरोज शेख अय्युब (रा. आलहिलाल कॉलनी) यांच्या नावावर घेतली होती. त्यासाठी १३ लाख रुपये कर्ज तर ८ लाख रूपये रोख रक्कम दिली होती. ही कार २२ डिसेंबर रोजी रात्री १ वाजता एपीआय कॉर्नर परिसरातील एका हॉटेलच्या समोर उभी करून हिवराळे हे हॉटेलमध्ये मालकास भेटण्यास गेले. त्याठिकाणी भेटून १५ मिनिटांनी बाहेर आले असता, कार चोरीला गेली होती. या कारची एक चावी शेख फेरोज यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावरही हिवराळे यांनी संशय व्यक्त केला आहे.

पोलिसही चक्रावुन गेलेहिवराळे यांच्या कारचे दरवाजे चावीने उघडून चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावुन गेले आहे. या गाडीचे फायनान्सचे काही हप्तेही थकले होते. त्यातून तर हा प्रकार घडलेला नाही ना? अशी शंकाही पोलिसांना आहे. त्यादृष्टीनेही पोलिस चौकशी करीत आहेत. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबाद