शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेला बछडा घाबरला; वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढताच धूम पळाला

By साहेबराव हिवराळे | Updated: April 12, 2023 12:03 IST

पळशी शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला विहिरीबाहेर सुरक्षित काढण्यासाठी पिंजरा सोडला होता.

छत्रपती संभाजीनगर: पळसी येथे बिबट्याचा बछडा सोमवारी दुपारी विहिरीत पडला ही खबर गुराख्याने वाऱ्यासारखी व्हायरल केली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्यास पिंजरा टाकून वाचविले अन् तो गतीने पळाल्याची घटना सायंकाळी घडली. 

पळशी शिवारातील आत्माराम पळसकर यांच्या शेतालगत देवीलाल यांचे शेत असून, त्याच्या विहिरीला कठडे असून देखील बिबट्याचा बछडा विहिरीत पडला होता. त्याचा बचावासाठी आवाज सुरू होता, त्याचवेळी गुरे चारणाऱ्या गुराख्याच्या तो आवाज कानी पडला अन् त्यांनी विहिरीतून आवाज कशाचा येतो म्हणून शहानिशा करण्यासाठी डोकावून पाहिले तर त्यात विहिरीच्या कठड्यावर बसलेल्या बछड्याला पाहून ते घाबरले. त्यांनी ही वार्ता सर्वत्र पसरली वनरक्षक बी.जी. भोसले यांना फोन आला, त्याच वेळी सोबत अधिकारी आर. एम. देशमुख होते. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रेस्क्यू पथकाला पाठविले...घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांना दिली. त्यांनी मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उप वनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांना कळवून रेस्क्यू पथकातील प्रकाश सूर्यवंशी, विश्वास साळवे यांच्या पथकाला घटनास्थळी पाठविले. वनरक्षक विजय चव्हाण हे विहिरीत खाली उतरले तर आर. टी, राठोड व इतर सदस्यांनी पिंजरा टाकून अतिशय हिमतीने त्या घाबरलेल्या बछड्याला पिंजऱ्यात घुसविले.

अधिवासात पिंजरा उघडतातच तो ....अतिदक्षता घेत पिंजरा रेस्क्यू पथकाने वनक्षेत्रात नेला, घाबरलेल्या अवस्थेत असल्याने आपण सुरक्षित असल्याची जाणीव होताच तो काही क्षणात वनक्षेत्रात पळून गेला. वन कर्मचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. - आर.एम. देशमुख, राऊंड अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगलleopardबिबट्या