शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

आरटीओ अधिकाऱ्यांजवळील बाॅडी कॅमेरा करेल चित्रीकरण; हुज्जत घालाल तर तुरुंगात जाल!

By संतोष हिरेमठ | Updated: September 14, 2023 18:58 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर भरा दंड, वाद घालणे पडेल महागात

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणे आता महाग पडू शकते. राज्यातील ५० प्रादेशिक कार्यालयातील वाहन निरीक्षकांना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांशी कोणी हुज्जत घातली तर त्याचे चित्रीकरण होईल आणि हा पुरावा ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांशी वाद घालण्यापूर्वी विचार केलेला बरा. अन्यथा थेट कारागृहातच जाण्याची वेळ येईल.

आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. अनेकदा कारवाई करताना वाहनधारक मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार निरीक्षकांसोबत वाद घालतात. कारवाई टाळण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, प्रसंगी धमकी देणे, हुज्जत घालून गोंधळही घातला जातो. त्यामुळे राज्यातील एक हजारांवर वाहन निरीक्षकांना बाॅडी कॅमेरे देण्यात येतील.

जिल्ह्यात ४२ अधिकाऱ्यांना मिळणार बॉडी कॅमेरेजिल्ह्यात १५ मोटार वाहन निरीक्षक व २७ सहायक मोटार वाहन निरीक्षक आहेत. या सर्वांना बाॅडी कॅमेरे मिळण्याची शक्यता आहे.

कॅमेऱ्यात दहा तासांचे स्टोरेजबाॅडी कॅमेऱ्यात किमान दहा तासांचे चित्रीकरण साठविण्याची क्षमता असते. त्यामुळे दिवसभरात कर्तव्यादरम्यानच्या प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण होईल.

कॅमेऱ्यातील चित्रीकरण पुरावा म्हणून ग्राह्यकोणताही वादाचा प्रसंग झाला तर बाॅडी कॅमेऱ्यातील चित्रीकरण हे पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. यातूनच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यास मदत होईल.

आठ महिन्यांत अनेकांनी घातली हुज्जतजिल्ह्यात ठिकठिकाणी आरटीओ निरीक्षक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारतात. अशा वेळी अनेक जण वाद घालतात. नेत्यांना फोन करून दबाव टाकण्याचाही प्रयत्न करतात. गेल्या आठ महिन्यांत अनेकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.

बाॅडी कॅमेरे उपयुक्त ठरतीलवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन निरीक्षकांकडून कारवाई केली जाते. बाॅडी कॅमेरे मिळाल्यास ते वाहन निरीक्षकांना उपयुक्त ठरतील. अनेक प्रसंगी त्यातील चित्रीकरणाचाच आधार घेता येईल.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद