शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना दिलासा; घाटी रुग्णालयात होणार बायपास, किडनी प्रत्यारोपण, मेंदूची शस्त्रक्रिया

By संतोष हिरेमठ | Updated: July 6, 2023 15:05 IST

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालय म्हटले तर केवळ छोटे-मोठे उपचार मिळतात, असा समज आहे; परंतु सरकारी रुग्णालयातही सुपर स्पेशालिटी उपचार मिळणार आहेत आणि हे शक्य होणार आहे घाटी रुग्णालयाच्या माध्यमातून. घाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ३० कोटींची यंत्रसामग्री प्राप्त झालेली आहे. अत्याधुनिक शस्त्रक्रियागारही सज्ज झाले आहे. किडनी प्रत्यारोपण, मेंदूची शस्त्रक्रिया, त्वचा प्रत्यारोपणही याठिकाणी लवकरच शक्य होणार आहे.

घाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कार्डियोलाॅजी (हृदयरोग), उरोशल्यचिकित्सक, युरोलाॅजी (मूत्रविकार), युरो सर्जरी (मूत्रशल्यचिकित्सा), न्यूरोलाॅजी (मज्जातंतू), न्यूरोसर्जरी (मज्जातंतू शल्यचिकित्सा), निओनॅटाॅलाॅजी (नवजात शिशू ) आणि प्लास्टिक सर्जरी हे ८ सुपर स्पेशालिटी उपचार देण्यात येणार आहेत. यासाठी तज्ज्ञ डाॅक्टरही मिळाले आहेत. बाह्यरुग्ण विभागाची सेवाही दिली जात आहे. नर्सिंग स्टाफ आणि इतर तांत्रिक मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागून लवकरच या ठिकाणी आंतररुग्ण सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, विशेष कार्य अधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांच्याकडून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

सध्या कोणकोणत्या सुविधा सुरू?केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत अतिविशेषोपचार रुग्णालयास (सुपर स्पेशालिटी) ३० कोटी रुपयांची यंत्रसामग्री प्राप्त झालेली आहे. सद्य:स्थितीत या रुग्णालयात अँजिओग्राफी, एमआरआय, डायलिसिस, टू डी इको इ. सुविधा रुग्णसेवेसाठी उपलब्ध आहेत. एकूण ८ अतिविशेषोपचार विभागातील बाह्यसेवा चालू करण्यात आली असून मंजूर असलेला नर्सिंग स्टाफ व इतर तांत्रिक स्टाफ मनुष्यबळ प्राप्त होताच आंतर रुग्णसेवा, ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करणे शक्य होईल. मेंदूच्या शस्त्रक्रिया, किडनी प्रत्यारोपण, त्वचा प्रत्यारोपण, बायपास शस्त्रक्रिया, हृदयाची झडप बदलण्याची इ. शस्त्रक्रिया होतील.- डाॅ. सुधीर चौधरी, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय (घाटी)

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर